कर्णकर्कश डीजे अन् धोकादायक लेझरवर लगाम घाला, कोपरगाव अंनिसची पोलिसांकडे मागणी
कोपरगाव समाचार :---सन उत्सवांच्या काळात डी जे च्या कर्णकर्कश आवाजासोबत लेझर लाईट चा होणारा गैरवापर नागरिकांच्या आरोग्यासाठी व पर्यावरणासाठी घातक ठरू शकतो त्यामुळे उत्सव साजरे करताना ध्वनी प्रदूषण व लेझरच्या वापराबाबत प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी.
सण, उत्सव हे आनंद सामाजिक एकोपा आणि संस्कृतीची प्रतीक आहे मात्र उत्सवाच्या नावाखाली मोठ्या आवाजात डी जे वाजवणे नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने ध्वनी प्रदूषण करणे योग्य नाही ,विशेषता लहान मुले ज्येष्ठ नागरिक रुग्ण तसेच प्राणी ,पक्षांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच बी. आय .एस मानकांचे उल्लंघन करून लेझर लाईट चा वापरही अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे नाहीतर डोळ्यांना इजा होण्याचा धोका असतो, ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण नियम) 2000 नुसार निर्धारित मार्गदर्शक अधिक आवाज करणाऱ्या आयोजकांवर कायदेशीर कार्यवाही करावी तसेच बी .आय. एस (BIS)कायदा 2016 नुसार आवश्यक परवानगीशिवाय साऊंड आणि लेझर सिस्टीमची विक्री, जोडणी आणि उत्पादन करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करून कारवाई करावी अशी विनंती कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोपरगाव कार्यकारिणी केलेली आहे
याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोपरगाव तालुका अध्यक्ष डॉअशोक गावित्रे ,कार्याध्यक्ष शिवराज दुशिंग, उपाध्यक्ष रामनाथ भुजाडे ,मेजर मारुती कोपरे बुवाबाजी संघर्ष विभाग राजेंद्र उगले ,युवा जागृती विभाग मेजर विनोद थोरात , प्रवीण आभाळे ,वैज्ञानिक जाणीव विभाग राहुल आभाळे ,व्यसनमुक्ती प्रबोधन विभाग किशोर शिंदे जिल्हा कार्यवाहक प्राध्यापक दीपक शिरसाठ आदी उपस्थित होते






