रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू
खिर्डी गणेश येथील घटना
कोपरगाव समाचार: -- रोटावेटरमध्ये अडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथे घडली. साहेबराव ( बाळनाथ ) पुंजाबा रोहोम (वय ६० ) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार साहेबराव रोहोम हे सोमवार दि.५ रोजी दुपारी १-०० वाजे दरम्यान आपल्या खिर्डी गणेश शिवारातील टाकळी फाटा येथील शेतात रोटावेटरने शेत जमीन तयार करीत होते. रोटावेटरमध्ये गबाळ अडकल्याने ते काढीत असताना साहेबराव रोहोम हे रोटावेटरमध्ये ओढले गेले.त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला. त्यांच्या पश्चात , पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.शेतक-यांच्या सुरक्षिततेबाबत आणि यंत्र सामग्री हाताळताना खबरदारी बाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.




