ajinky

banner ads

ऋषीपंचमीनिमित्त संवत्सरला मीराबाई मिरीकर यांचे किर्तन

kopargaonsamachar
0

ऋषीपंचमीनिमित्त संवत्सरला मीराबाई मिरीकर यांचे किर्तन

कोपरगाव समाचार :--कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे सालाबादप्रमाणे ऋषीपंचमीनिमित्त प्रख्यात किर्तनकार ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्री शनी महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून या किर्तन श्रवणाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले.


प. पू. रामदासी महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्व. नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली  गेल्या ३८ वर्षांपासून सुरू झालेल्या या किर्तनाची परंपरा संवत्सर या गांवी आजही अव्याहतपणे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संवत्सर येथे शुक्रवार दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे ‌यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत किर्तन सोहळ्याबरोबरच महाप्रसादाचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाली.



ऋषीपंचमीचा दिवस हा महिलांच्या खास श्रध्देचा दिवस असतो . गोदावरी नदीमध्ये स्नानाची पर्वणी साधल्यानंतर संवत्सर गांवात श्री शनी महाराज मंदिराच्या प्रागणात ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांचे किर्तन ऐकण्यासाठी महिला जमतात. किर्तनानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जातो. या वेळी लाखोच्या संख्येने महिलांची उपस्थिती असते. यावर्षीही मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हा किर्तन सोहळा पार पडणार आहे. या किर्तन श्रवणाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!