ajinky

banner ads

सोनेवाडी पतसंस्थेच्या संचालक पदी जावळे, गुडघे, भोजने यांची बिनविरोध निवड

kopargaonsamachar
0

 सोनेवाडी पतसंस्थेच्या संचालक पदी जावळे, गुडघे, भोजने यांची बिनविरोध निवड 

कोपरगाव समाचार :--- कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील सोनेवाडी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नैमित्तिक रिक्त झालेल्या संचालक पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये आप्पासाहेब कारभारी जावळे, किसन शिवराम जावळे, विलास विठ्ठल गुडघे व गोरख श्रावण भोजने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 




निवड प्रक्रियेचे कामकाज तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,कोपरगाव  यांचे आदेशानुसार प्राधिकृत अधिकारी आर.एन.रहाणे यांनी काम पाहिले. त्यांना संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानदेव कऱ्हाडे यांनी मदत केली.यावेळी सहाय्यक सहकार अधिकारी आय आय शेख, संस्थेचे अध्यक्ष दीपक जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब दहे, संचालक अजय जावळे, योगेश खरात, सौ कृष्णाबाई जावळे, सौ पुष्पा जावळे, माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर जावळे अदी उपस्थित होते. 



नवनिर्वाचित संचालक पदी निवड झाल्याबद्दल बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा संस्थेच्या व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी कोपरगाव तालुका युवा सेना उपाध्यक्ष कर्णासाहेब जावळे, विजय मिंड, शशिकांत चव्हाण, लक्ष्मण जावळे, सोमनाथ रायभान अदी उपस्थित होते. यावेळी आप्पासाहेब जावळे यांनी सांगितले की सोनेवाडी  पतसंस्था ही पंचक्रोशीतील ठेवीदार कर्जदार व सभासद यांची जननी अजुन आहे. 

संस्थेचा आर्थिक आलेख वाढविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे देखील जावळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष दीपक जावळे यांनी केले तर आभार संस्थेचे संस्थापक किशोर जावळे यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!