ajinky

banner ads

पंतप्रधान मोदींसमोर संजीवनीच्या ब्रास बँडची सलामी

kopargaonsamachar
0

 पंतप्रधान मोदींसमोर संजीवनीच्या  ब्रास बँडची सलामी

कोपरगाव समाचार ---: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एकता नगर, गुजरात येथे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या  भव्य राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्यातील  ‘एकता परेड-२०२६’ मध्ये संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या ब्रास बँड पथकाला ‘स्कूल बँड डिस्प्ले’ अंतर्गत सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय एकात्मता विभागाने अधिकृत पत्राद्वारे शालेय बँड पथकांमधून संजीवनी सैनिकी स्कूलच्या पथकाची केलेली ही निवड संस्थेच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची, सांगीतिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या राष्ट्रनिष्ठेची राष्ट्रीय पातळीवरील दखल आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात विश्वस्त सुमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  विद्यार्थी देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आणि संजीवनीच्या गुणवत्तेचा गौरवपूर्ण निनाद घुमविणार असून, कोपरगावच्या ग्रामीण भूमीतून घडलेले हे विद्यार्थी थेट राष्ट्रीय मंचावर आपल्या कर्तृत्वाची अमिट छाप उमटविणार आहेत.या प्रतिष्ठेच्या संधीमुळे संजीवनी परिवारासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.




संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे,  विश्वस्त   सुमित कोल्हे यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, प्राचार्य के.एल. दरेकर, संगीत शिक्षक महेश  गुरव, नॉन अकॅडमिक डायरेक्टर डी. एन. सांगळे, कॅम्पस   अॅडमिन विजय भास्कर, कल्चरल हेड शुभम जाधव यांचे अभिनंदन केले आहे. श्री गुरव, श्री भास्कर व श्री जाधव विद्यार्थ्यांसमवेत जाणार आहे.      




सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. यावर्षी गुजरात राज्यातील एकता नगर (स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसर) येथे होणाऱ्या  राष्ट्रीय सोहळ्यास  भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. या भव्य कार्यक्रमात विविध राज्यांचे पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राष्ट्रीय छात्र सेना,  तसेच देशभरातील पुरस्कारप्राप्त शालेय मार्चिंग व बँड पथके सहभागी होणार आहेत.
   २१ ऑक्टोबरपासून एकता नगर येथे सुरू होणाऱ्या  संयुक्त सराव शिबिरात सहभागी होत हे पथक ३१  ऑक्टोबर रोजी होणाऱ्या  राष्ट्रीय एकता परेडमध्ये आपली कला, शिस्त आणि देशभक्तीचे दर्शन घडविणार आहे. सीमा सुरक्षा बल यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील निवडक बँड पथकांसोबत संयुक्त सरावही आयोजित करण्यात येणार आहे.


   संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ब्रास बँड स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या यशानंतर आता राष्ट्रीय एकता परेड-२०२६ साठी निवड मिळवून पुन्हा एकदा आपल्या गुणवत्ता, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रप्रेमाचा ठसा उमटविला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देशाच्या सर्वोच्च राष्ट्रीय मंचावर सातत्याने यश मिळविणे ही संजीवनीच्या मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीची आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांची पावती आहे. राष्ट्राची एकता, अखंडता आणि देशभक्तीची भावना जपणाऱ्या  या विद्यार्थ्यांचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मंचावर निर्माण केलेला हा गौरव संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.संजीवनी सैनिकी स्कूलच्या या यशामुळे कोपरगाव, अहिल्यानगर जिल्हा आणि महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले असून, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. -
नितिनदादा कोल्हे, अध्यक्ष (संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स )
   
   



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!