कोपरगाव वकील संघास पर्यावरण पूरक गणेश मूर्ती भेट
कोपरगाव समाचार :---तळेगाव मळे येथील अवधूत चिंतन गो शाळेच्या वतीने गीर गाईच्या शेणा पासून बनवलेली पर्यावरण पूरक गणेशमूर्ती कोपरगाव वकील संघास भेट देऊन पर्यावरण संरक्षण करण्याचा संदेश देण्यात आला.
तळेगाव मळे येथील अवधूत चिंतन गो शाळेच्या वतीने या वर्षी गीर गाईच्या शेणा पासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्यात आल्या आहे.या वेळी अवधीत चिंतन गो शाळेचे प्रमुख महेंद्र टुपके यांनी सांगितले की गावठी गायी पाळण्याचे व त्यांचे संगोपन करण्याचे प्रमाण कमी झाले असून शेतकरी खाट्या गाई कसायांना विक्री करतात. मात्र आम्ही गो पाळणाचा संकल्प केला असून या गो शाळेत साधारण वीस गायी आहेत.
एक गाई पासून महिन्या भरात तीनशे किलो शेण मिळते या शेणाचा उपयोग शेण खता बरोबरच यंदा आम्ही पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवल्या असून गणेश मूर्ती बरोबरच घड्याळ चप्पल व विविध आकर्षक वस्तू बनवल्या आहेत. प्लास्टर ऑप पॅरिस पासून बनवलेल्या मूर्ती नदीत विसर्जित केल्यानंतर अनेक दिवस विरघत नाहीत त्यामुळे नदी नाले, विहिरी प्रदूषित होऊन पर्यावरणाची हानी होत असून ही गंभीर समस्या आहे या उलट ही मूर्ती पाण्यात विरघळून दुसऱ्या दिवशी झाडाला खत म्हणून वापरता येते. नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बसून पर्यावरनाला हातभार लावावा असे आवाहन कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ऍड दिलीप लासुरे यांनी केले.
या वेळी ऍड नितीन पोळ, ऍड अतिश अगवान, ऍड नितीन खैरनार, ऍड गौरव गुरसळ, ऍड. निकोले,ऍड बाबासाहेब सोनावणे ऍड वाकचौरे, ऍड वलटे,आदी उपस्थित होते.







