ajinky

banner ads

पोहेगाव-सोनेवाडी रस्त्याबाबत ठेकेदार अजूनही निष्काळजी

kopargaonsamachar
0

 पोहेगाव-सोनेवाडी रस्त्याबाबत ठेकेदार अजूनही निष्काळजी

कोपरगाव समाचार --- आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून पोहेगाव-सोनेवाडी-सावळी विहीर रस्त्यासाठी २.२८ कोटी निधी मिळालेला असून या रस्त्याची वर्क ऑर्डर अर्थात कार्यारंभ आदेश ८ ऑक्टोबर २०२४ रोजी देण्यात आला आहे.मात्र अजूनही निष्काळजी ठेकेदाराकडून ह्या रस्त्याचे काम सुरु करण्यात आलेले नसल्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी तातडीने पोहेगाव-सोनेवाडी-सावळी विहीर रस्त्याचे काम सुरु करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तुळशीराम दहिफळे यांना दिले असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन काकासाहेब जावळे यांनी दिली आहे.




पोहेगाव व सावळीविहीरच्या नागरीकांना शिर्डीला जाण्यासाठी अतिशय जवळचा असणारा पोहेगाव-सोनेवाडी-सावळी विहीर रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी या रस्त्यासाठी २.२८ कोटी निधी मंजूर करून आणला. मात्र कार्यारंभ आदेश प्रसिद्ध होवूनही अद्यापपर्यंत सबंधित ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोहेगाव-सोनेवाडीच्या नागरीकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते.आमदार आशुतोष काळे सातत्याने पाठपुरावा करून रस्त्यांसाठी निधी आणून लवकरात लवकर वर्क ऑर्डर प्रसिद्ध होवून कामाला सुरुवात होण्यासाठी शेवटपर्यंत त्यांचे प्रयत्न सुरु असतात. त्या प्रयत्नातूनच पोहेगाव-सोनेवाडी-सावळी विहीर रस्त्याला निधी उपलब्ध करून दिला, वर्कऑर्डर पण निघाली तरी पण रस्त्याचे काम सुरु होत नसल्याकडे काकासाहेब जावळे यांनी पोहेगावच्या एका कार्यक्रमा दरम्यान आमदार आशुतोष काळे यांचे लक्ष वेधले.




त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तुळशीराम दहिफळे यांना नागरीकांना खराब रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासाची गांभीर्याने काळजी घेवून रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना दिल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच काम सुरु करणार असल्याचे उपअभियंता सीताराम दहिफळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे पोहेगाव-सोनेवाडीच्या नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असल्याचे काकासाहेब जावळे यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!