ajinky

banner ads

लालबागच्या राजाच्या गणेश मूर्तीचे कोपरगावकरांनी केले जोरदार स्वागत

kopargaonsamachar
0

लालबागच्या राजाच्या गणेश मूर्तीचे कोपरगावकरांनी केले जोरदार स्वागत

कोपरगाव समाचार --संघर्ष फाऊंडेशन ट्रस्ट, सार्वजनिक गणेश उत्सव समिती, कोपरगावच्या वतीने यंदा १४ व्या वर्षी भव्य गणेशोत्सव साजरा होत आहे. यंदाच्या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे मुंबईच्या लालबागच्या राजाचे सुप्रसिद्ध मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांच्या हाताने साकारलेली प्रति लालबागच्या राजाची गणेश मूर्ती चे कोपरगावकरांनी जोरदार स्वागत केले आहे.या मंगलमय मूर्तीचा नुकतेच स्वागत करण्यात आले आहे.यावेळी आगमन मिरवणुक श्री.स्वामी समर्थ मंदिर मेन रोड, छ. शिवाजी महाराज पुतळा, अण्णा भाऊ साठे पुतळा ते येवला रोड, कोपरगाव या मार्गावरून ही भव्य मिरवणूक काढण्यात आली.



 भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे स्वागत केले. या या आगमन सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी दोन प्रमुख आकर्षण ठरले त्यात मुंबईचा प्रसिद्ध चेंबूर बिट्स बँड व जय तुळजा भवानी तरुण मंडळाचा ढोल-ताशा पथक ढोल-ताशाच्या गजरात आणि बँडच्या तालावर बाप्पाचे आगमन अविस्मरणीय ठरले आहे . 




यंदाचे १४ वे वर्ष असल्याने मंडळाने उत्सव अधिक भव्य करण्यासाठी नियोजन केले.यावेळी बाप्पाचे आगमन  सोहळ्याची आरती संत जनार्धन स्वामी आश्रमाचे मठाधीपती रमेशगिरी महाराज, आत्मा मलिक ध्यानपिठाचे परमानंद महाराज,राघवेश्वरानंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष अभिजित सरोदे, तुषार सरोदे, रोहित पटेल, नितीन वानखेडे, गुर्मीत दडियाल, राहुल देवरे,निखिल सांगळे, कार्तिक सरदार,वासुदेव शिंदे,राजू पटेल, नीरज डंबीर,अर्जुन माकोने, संकेत निकम, हाफिज शेख, गोटू खिल्लारी,अभिषेक जाधव,ओम बागुल,मयूर गायकवाड, वैभव सोळसे,योगेश पटेल, दिनेश शिंदे, सिद्धार्थ शेलार, विकास वाळुंज, वेदांत पटेल,भल्लू ठक्कर, कार्तिक सरदार, भूषण सोनवणे,रितेश राऊत आदिसह मोठ्या प्रमाणावर मंडळाचे सदस्य व कोपरगावकर नागरिक उपस्थित होते.

गेली १३ वर्षे कोपरगावकरांनीआमच्यावर भरभरून प्रेम केले आहे. हे १४ वे वर्ष अविस्मरणीय व्हावे म्हणून आम्ही यंदा थेट लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी यांच्याकडून मूर्ती घडवून आणली आहे. कोपरगावकरांना मुंबईच्या लालबागच्या राजाची अनुभूती आपल्याच शहरात मिळावी हाच आमचा प्रयत्न आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या भव्य आगमन सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले त्यामुळे त्याचे मनापासून धन्यवाद .

- अभिजित सरोदे. अध्यक्ष संघर्ष फाऊंडेशन ट्रस्ट, कोपरगांव


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!