banner ads

राष्ट्रवादीला दृष्टीदोष तपासण्याची गरज, पथदिव्यांचे काम सुरू असताना आंदोलनाची नौटंकी

kopargaonsamachar
0

 

राष्ट्रवादीला दृष्टीदोष तपासण्याची गरज, पथदिव्यांचे काम सुरू असताना आंदोलनाची नौटंकी - दीपक जपे 


कोपरगाव समाचार:-श्री साईबाबा कॉर्नर ते टाकळी फाटा या मार्गावरील पथदिवे काम सुरू असून खांबांना रंग देत अधिक सुसज्ज करण्याचे काम कोपरगाव नगरपरिषदेकडून सुरू आहे. चालू असणाऱ्या कामांचे त्रास होत असल्याने वारंवार खोट्या आरोपांनी तोंडघशी पडणाऱ्या विरोधकांचे आणखी एक पितळ उघडे पडले असल्याची टीका दीपक जपे यांनी केली आहे.





स्वतःच्या काळात लोकप्रतिनिधी यांना कवडीचे काम करता आले नाही.लोकप्रतिनिधी व प्रशासकीय काळात अनेक प्रश्न निर्माण झाले त्यावर काहीही कार्यवाही करता आली नाही असे स्वतःच कार्यशून्य असणारे विरोधक यांना पालिकेचे काम रुचत नाही हे स्पष्ट होते.



युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वासनामा प्रत्यक्षात साकारण्यासाठी नगराध्यक्ष पराग संधान व उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर व सर्व सभापती आणि नगरसेवक यांचे काम सुरू आहे.कायमच काविळ झालेले राष्ट्रवादीचे लोक हे चालू कामांची सवंग लोकप्रियतेसाठी नाटक करत विरोधाची बाजू दाखवतात मात्र वास्तविक पाहता अनेक कामे आधीच सुरू झालेली आहे हे जनतेला दिसते आहे.
भौतिक सुधारणा,विकासकामे गतिमान करणे,पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा,स्वच्छता,आरोग्य यासह अनेक कामे सुरू आहेत मात्र विरोधकांना सवयीप्रमाणे तोंडघशी पडण्याची त्यांनी कृती केली आहे असा टोलाही जपे यांनी लगावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!