संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज महर्षी स्कूलचा दहावी निकालात झळाळते यश
शंभर टक्के निकालासह जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा मानकोपरगाव समाचार:-यंदाच्या सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज महर्षी स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत उज्वल यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेसह यश मिळवून संस्थेचा नावलौकिक उंचावला आहे.
विद्यालयातील एकूण १४७ विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अनेक विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्तेसह यश मिळवले आहे. यामध्ये कुमार तनीष मुंदडा यांनी ९९.६% गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच कुमार तनीफ निकुंभ यांनी ९८.६% गुणांसह द्वितीय क्रमांक, तर कुमार हर्षल मते यांनी ९७.८% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
विद्यालयातील २० विद्यार्थ्यांनी ९५% पेक्षा जास्त गुण मिळवले असून ४२ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तसेच ७१ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा जास्त गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विषयानुसारही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले असून सामाजिक शास्त्र विषयात २, मराठीमध्ये ७, संस्कृतमध्ये ४ व आयटी विषयात ४ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत इतिहास घडवला आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून कौतुक होत असून संस्थेचे माननीय अध्यक्ष दत्तात्रय होळकर उपाध्यक्ष विलासराव कोते पाटील, प.पू. रमेशगिरीजी महाराज, विश्वस्त, सचिव अंबादास अंत्रे, सर्व विश्वस्त प्राचार्य राजेंद्र पानसरे, डॉ. श्रीरंग झावरे तसेच सर्व विश्वस्त मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच उपप्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे पालकवर्गात समाधानाचे वातावरण असून परिसरातही संस्थेच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.




