banner ads

कोपरगावात 'फार्मट्रेक' भव्य शेतकरी मेळावा संपन्न!

kopargaonsamachar
0

 

 कोपरगावात 'फार्मट्रेक' भव्य शेतकरी मेळावा संपन्न!

आधुनिक तंत्रज्ञान आणि कष्टाची सांगड;
कोपरगाव समाचार : --- बदलत्या काळानुसार शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्रमाची बचत आणि उत्पादनात वाढ करणे काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने कोपरगाव येथील 'शेतकरी ट्रॅक्टर' (येवला रोड) आणि 'फार्मट्रेक' कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला 'भव्य शेतकरी मेळावा व परिसंवाद' मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यास कोपरगाव परिसरातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.




दिग्गजांची उपस्थिती आणि मार्गदर्शन: या मेळाव्याला कंपनीचे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र सेल्स अधिकारी भालचंद्र माने, रिजनल बिझनेस मॅनेजर रवींद्र कदम, झोनल मॅनेजर (फार्म पावर) अभिषेक कुमार, एरिया सर्विस मॅनेजर संजय कुमावत, एरिया रिटेल मॅनेजर महेश पावशे, एरिया सेल्स मॅनेजर शुभम खेडकर आणि प्रोजेक्ट सपोर्ट ऑफिसर प्रकाश जेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे श्रम कमी करून कमी वेळेत ट्रॅक्टरच्या साहाय्याने जास्तीत जास्त काम कसे करता येईल, यावर तांत्रिक व मोलाचे मार्गदर्शन केले.
सेंद्रिय शेती आणि पाणी नियोजनाचा गुरुमंत्र: मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले ते प्रगतशील शेतकरी उत्तम बादशाह पुणे यांचे मार्गदर्शन. त्यांनी सेंद्रिय खतांच्या वापराद्वारे जमिनीचा पोत सुधारणे (Soil Recharging) आणि पाण्याचा काटकसरीने वापर करून विक्रमी उत्पादन कसे घ्यावे, याचे प्रॅक्टिकल सूत्र शेतकऱ्यांना सांगितले. तसेच आप्पासाहेब गाडे व हरिश्चंद्र गायकवाड यांनी आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले.


स्थानिक नेतृत्वाचे नेटके नियोजन: 'शेतकरी ट्रॅक्टर'चे सर्वेसर्वा वेदांत करपे यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण वडांगळे, सागर गायकवाड आणि अनिकेत करपे यांनी या मेळाव्याचे अत्यंत नेटके नियोजन केले होते. आधुनिक कृषी अवजारे आणि फार्मट्रेक ट्रॅक्टरची कार्यक्षमता पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शोरूमचे सर्विस मॅनेजर गणेश मोकाटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शुभम खेडकर यांनी मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शोरूम मधील सेल्स टीमने विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!