banner ads

ब्रम्हलिन संत रामदासी महाराजांच्या तपभूमित दासनवमी निमीत्त भिक्षाफेरी

kopargaonsamachar
0

 

ब्रम्हलिन संत रामदासी महाराजांच्या तपभूमित दासनवमी निमीत्त भिक्षाफेरी 


कोपरगांव समाचार :--  तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथे दक्षिणगंगा गोदावरी नदी तिरावर ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांनी तप साधनेसह योगसाधना केली, येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी दास नवमी निमीत्त गांवक-यांनी भिक्षाफेरी काढली होती.  





श्रीक्षेत्र कोकमठाण येथील तीनखणीत ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. त्यांच्या महानिवार्णानंतर येथे गेल्या ३६ वर्षापासुन रामदासी महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा साजरा केला जातो. प्रत्येक पुण्यतिथीस पारायण होते. ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांनी लहान मुलांना अध्यात्म संस्काराची शिकवण दिली. रामरक्षा, मारूतीस्तोत्र, गीता, स्वाध्याय, हरिपाठ, हरिहरभेट, विविध ग्रंथ यातुन नित्याचा पाठ शिकविला. रामदासीबाबा भक्त मंडळाच्यावतीने येथे गुरूपौर्णिमा, पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो. दासनवमी निमीत्त गावात सुप्रभात समयी भिक्षाफेरी काढुन धान्य, शिधा गोळा केला जातो आणि दासनवमीला त्याचा महाप्रसाद सर्वांना वाटण्यांत येतो. आजच्या बदलत्या समाजमाध्यमाच्या काळात संस्कार महत्वाचे झाले आहे. भ्रमणध्वनी कृत्रीम बुध्दीमत्ता यामुळे मनुष्याच्या विचाराच्या दिशा दिवसेंदिवस कमकुवत होत चालल्या आहे.

परस्वाधीन जीणं वाढत आहे. अध्यात्म हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे तेंव्हा भौतिक सुखात समर्थ रामदासस्वामींच्या मनाचे श्लोक, दासबोधाचे सार प्रत्येकाने ग्रहण करावे तीच दासनवमी निमीत्त खरी सेवा ठरणार आहे आशा विचारांचे प्रबोधन या भिक्षाफेरीतून उपस्थित भजनी मंडळींनी केले. गावातील शाळकरी मुले, मुली, महिला भगिनी, आबाल वृद्ध या भिक्षा फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!