banner ads

कोपरगाव जवळील अपघातात दोन गंभीर जखमी

kopargaonsamachar
0
कोपरगाव जवळील अपघातात दोन गंभीर जखमी

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव शहरानजीक असलेल्या  नगर मनमाड रोड वरील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलावर स्कोर्पिओ कार क्रमांक MH -16 DG- 2666 व स्कोडा कार क्रमांक MH - 43 BE - 2080 ही दोन्ही  वाहने समोरा समोर धडकल्याने भीषण अपघात झाला असून यात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारमधील एअर बॅग उघडल्या गेल्या होत्या वाहने एकमेकांमध्ये अडकलेली होती .
या अपघातातील   दोन्ही जखमींना पुढिल उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
सदर अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावर दुतर्फा तब्बल एक तासापासून वाहनांच्या रांगा  लागल्याने वहातुकीची कोंडी झाली  होती.
सदरची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलिस पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर शेलार, पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ लिंबोरे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघात झालेली वाहने क्रेनच्या सहाय्याने हटवत वाहतूक सुरळीत केली आहे.आद्यप या प्रकरणी कोणत्याही गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेला नसून पुढील तपास  शहर पोलिस करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!