banner ads

हृदयरोग तज्ञ डॉ. गौरव वर्मा यांचा जागतिक स्तरावर सन्मान

kopargaonsamachar
0

 

हृदयरोग तज्ञ डॉ. गौरव वर्मा यांचा जागतिक स्तरावर सन्मान


कोपरगाव समाचार :--     हृदयरोग उपचार क्षेत्रात नवे क्षितिज गाठणाऱ्या आणि इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीच्या सुवर्णपरंपरेला नवे तेज देणाऱ्या वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांना जागतिक स्तरावर मान्यता असलेली प्रतिष्ठित “अँड्रियास ग्रुएंत्झिग फेलोशिप” बहाल करण्यात आली आहे. या गौरवाने वैद्यकीय क्षेत्रात अभिमानाचा नवा मानदंड निर्माण झाला असून परिसरासाठी ही विशेष अभिमानाची बाब ठरली आहे.




             इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. अँड्रियास ग्रुएंत्झिग यांनी मानवामध्ये पहिली कोरोनरी अँजिओप्लास्टी यशस्वीरीत्या करून हृदयरोग उपचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांच्या अद्वितीय कार्याची प्रेरणादायी परंपरा जपत दिली जाणारी ही मानाची फेलोशिप वैद्यकीय सेवेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या तज्ज्ञांना प्रदान केली जाते.
             ही प्रतिष्ठित फेलोशिप ए.सी.एल., लंडन यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आली. इटलीचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अँटोनियो कोलंबो तसेच झुरिच (स्वित्झर्लंड) येथील नामांकित तज्ज्ञ डॉ. बर्नहार्ड मायर यांच्या हस्ते डॉ. वर्मा यांना हा सन्मान देण्यात आला.





             या जागतिक गौरवामुळे डॉ. वर्मा यांच्या कार्याचा लौकिक अधिकच उजळला असून त्यांच्या अथक सेवेमुळे हृदयरोग उपचार क्षेत्राची प्रतिष्ठा उंचावली आहे. वैद्यकीय सेवेतील त्यांच्या समर्पण, कौशल्य आणि संशोधनपर दृष्टीकोनाचा हा मानाचा शिरपेच ठरला असून संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!