banner ads

संजीवनीच्या पाच विद्यार्थ्यांना डेलाॅईट कंपनीत नोकरीची संधी

kopargaonsamachar
0

 

संजीवनीच्या पाच विद्यार्थ्यांना डेलाॅईट कंपनीत नोकरीची संधी


कोपरगांव समाचार --: जगभरातील  कंपन्यात स्वतःचे वेगळे स्थान असलेल्या डेलाॅईट या कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या पाच विद्यार्थ्यांना आकर्षक वेतन देऊन नोकरीची संधी दिली. या कंपनीचे मुख्यालय लंडन येथे आहे. संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारामुळे या विद्यार्थ्यांना हि संधी मिळाली. त्यात संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनिअरींग, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स अँड  कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या अंतिम सत्राची परीक्षा देणा-या पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  




    संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नातून या कॅम्पस  प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले . या कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या प्रतिनिधिंनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. संजीवनीच्या कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या सार्थक सतीश  चौधरी,आदित्य अनिल पानगव्हाणे, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या उत्कर्ष  सुनिल जाधव, चेतन बाबासाहेब वाकळे व इलेक्ट्रॉनिक्स अँड  कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या जान्हवी आनंद बारबिंड यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली.
     ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभाग व संबधित अभियांत्रिकी शाखेचा  विभाग यांच्या परस्पर पुरक समन्वयातुन विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यात आणि चांगल्या वेतनाच्या नोकरीच्या संधी मिळत आहेत. उद्योग जगताला हवे असलेले शिक्षण देण्यावर भर दिला जात असल्याचा हा परिणाम आहे. ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागा मार्फत विद्यार्थ्यांकडून मुलाखतींचा सराव करून घेतला जातो. त्यातून त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण होतो.




मी धामणगाव फाटा (ता. अकोले) येथिल शेतकरी कुटूंबातील मुलगा आहे.  मी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा डीप्लोमा अन्य  एका पॉलीटेक्निकमधुन केला. त्यावेळी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या प्लेसमेंटच्या सातत्या बद्दल माहिती होती.  त्यामुळे  संजीवनी इंजिनिअरींग मध्ये प्रवेश घेतला. संजीवनीला ऑटोनॉमस दर्जा असल्याने  डीग्री बरोबरच ऑनर डीग्री सुध्दा प्राप्त करता येते. त्यासाठी वैकल्पिक विषय  निवडावे लागतात.  मी सायबर सिक्युरीटी हा विषय  निवडला. त्याचा  फायदा मला जगातील टॉपच्या डेलॉईट कंपनीत माझी निवड झाली.  आम्हाला शेवटच्या सत्रात इंटर्नशिप  करावी लागते. तर याच कंपनीमार्फत भुवनेश्वर  (ओडीसा) येथे स्कील डेव्हलपमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्युट  मध्ये इंटर्नशिपसाठी माझी निवड झाली आहे. संजीवनीमुळे माझे आणि कुटूंबियांचे स्वप्न साकर झाले.
---- सार्थक चौधरी, विद्यार्थी  

संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!