banner ads

सहकाराची जाण असलेला नेता काळाने हिरावला-बिपीनदादा कोल्हे

kopargaonsamachar
0

 

सहकाराची जाण असलेला नेता काळाने हिरावला-बिपीनदादा कोल्हे


कोपरगाव समाचार :-- ग्रामिण अर्थकारणाला दिशा देणा-या साखर उद्योगातील प्रत्येक प्रश्नांशी बांधिलकी, आपूलकी जपणारा नेता म्हणून देश उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाकडे पहात होता असा सहकाराची जाण असलेला नेता काळाने हिरावला अशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शोक व्यक्त करत शब्दसुमनांजली वाहिली.




        सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाबददल कारखाना व संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने शुक्रवारी श्रध्दांजलीची शोकसभा घेण्यांत आली त्यात ते बोलत होते.
        प्रारंभी कै. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यांत आली.
        बिपिनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, ग्रामिण आणि शहरी भागातील प्रत्येक छोटया छोटया प्रश्नांची जाण असलेला नेता आणि त्याची सोडवणुक करणारे व्यक्तीमत्व म्हणून कै. अजितदादा पवार यांचा सर्वत्र  लौकीक होता.
        शेतक-यांना शेतीला जोडधंदा असावा म्हणून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी दुग्धोत्पादन व्यवसाय सुरू केला होता पण त्याचा संगोपन खर्च आणि प्रत्यक्षात निघणारे दुधाचे उत्पादन याचा ताळमेळ बसत नव्हता म्हणून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ३० ऑगस्ट १९८७ रोजी संजीवनी कार्यस्थळावर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय दुध मेळावा घेवुन दुधाचे दर वाढवावे म्हणून मागणी केली होती त्या आंदोलनांत उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांनी संजीवनी (कोपरगांव) येथे हजेरी लावली होती. युवा कारकिर्दीत राजकीय क्षेत्रात पाउल ठेवण्याच्या अगोदरचे त्यांचे हे पहिलेच दुध आंदोलन असावे व त्याची पार्श्वभूमी त्यांनी समजुन घेतली असे सांगुन ते पुढे म्हणाले की, सहकार, शेती, शिक्षण, समाजकारण, राजकारण, दुग्ध, प्रशासकीय, व्यवस्थापकीय आदि प्रत्येक क्षेत्रासह देश विदेशातील अर्थनितींचा त्यांचा परिपुर्ण अभ्यास होता. शब्दाचे ते पक्के होते. एखादे काम होणार असेल तरच ते त्याची ग्वाही द्यायचे आणि जे होणार नसेल ते स्पष्टपणे सांगणारे व्यक्तीमत्व होते.




         माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे देहावसन झाल्यानंतर ते सांत्वनासाठी कोल्हे वस्तीवर आले असता उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांनी १९९९ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन्याच्या आणि त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून विधीमंडळात काम करावयाचे होते त्यासाठी त्यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्फत थेट शरद पवार यांच्याशी कसे संधान साधले होते त्या सर्व जुन्या आठवणींना उजाळा देत स्व. शंकरराव कोल्हे यांच्या शिस्तप्रिय आणि वेळेला महत्व देवुन देश विदेशातील साखर कारखानदारीचा गाढा अभ्यास असलेल्या नेतृत्वाला आपण कसे मुकलो हे कै. अजितदादा पवार यांनी सांगितले व त्यांच्यामुळेच साखर कारखानदारी आणि आधुनिकीकरण, संजीवनी कारखान्याचे देशपातळीवरील प्रत्येक वेगवेगळे उपक्रम प्रत्यक्ष समजुन घेता आले अशी कबुलीही दिली होती.
         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुका भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, शिंदे शिवसेना आदि मित्रपक्षाच्या महायुतीने लढविल्या त्यात कोपरगांव विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटयाला गेली. आशुतोष काळे यांना उमेदवारी मिळाली आणि त्याच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार हे आपली प्रत्यक्ष गाठ घेण्यासाठी आले होते त्यावेळी सर्वांच्यावतीने दिलेला शब्द पाळू असे सांगत आमदार आशुतोष काळे यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्क्यांने कोपरगांव विधानसभा मतदार संघातुन पाठविले अशी आठवण सांगुन बिपिनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या मृत्युच्या अगोदर एक दिवस २७ जानेवारी २०२६ रोजी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांचा वार्तालाप झाला होता त्यात त्यांनी संजीवनीसह गणेश, रानवड कारखान्याच्या गाळपाची माहिती घेत नव्याने उभारलेल्या बायो सीएनजी व पोटॅश ग्रॅन्युएल खत प्रकल्पातुन सुरू झालेल्या उत्पादनाविषयी कुतूहलाने बारीक-सारीक तपशिल जाणून घेतले व पुढील राजकीय कारकिर्दीस सदिच्छाही व्यक्त केल्या. 
         त्यांचे स्वच्छता आणि झाडे लावा झाडे जगवा या अभियानावर विशेष प्रेम होते तेच आपल्याही आवडते म्हणुनच उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार व आमच्या विचारांची तार जुळली अशी आठवण करून देत त्यांच्या अकाली जाण्यांने राज्यासह देशाचे मोठे नुकसान झाले आहे असेही बिपीनदादा कोल्हे शेवटी म्हणाले.
         याप्रसंगी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, संचालक विश्वासराव महाले, रमेश घोडेराव, विजय रोहोम, सीईओ शिवकुमार, कामगार नेते मनोहर शिंदे, कार्यकारी संचालक सुहास यादव, संजीव पवार, संभाजीराव बोरनारे यांच्यासह सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!