banner ads

कोपरगाव येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या आमदार निधीतून शैक्षणिक साहित्य वाटप

kopargaonsamachar
0

 

कोपरगाव येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या आमदार निधीतून शैक्षणिक साहित्य वाटप


कोपरगाव समाचार :--शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे माध्यम आहे दर्जेदार शिक्षणासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी बनवलेला कृती आराखडा पश्चिम महाराष्ट्र चा शैक्षणिक विकास घडवेल असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इंजिनीयर माधवराव देशमुख यांनी व्यक्त केला.




कोपरगाव तालुक्यातील 23 माध्यमिक विद्यालयांना नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या आमदार निधीतून प्रत्येकी सुमारे 55 हजार रुपये किमतीचे अहुजा कंपनीचे पोडियम उपकरण वाटप करण्यात आले त्याप्रसंगी अध्यक्षपदावरून माधवराव देशमुख बोलत होते यावेळी कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष ॲड . डॉ. प्रा . हिरालाल महानुभव के बी पी माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचे प्राचार्य काशिनाथ लव्हाटे कन्या माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य धनक , न्यू इंग्लिश स्कूल ब्राह्मणगाव च्या प्राचार्या सौ. सुनीता शिंदे, करुले तालुका संगमनेर येथील लोकनियुक्त सरपंच व सरपंच सेवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब आहेर. कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष नीलकंठ .


कोपरगाव तालुक्यातील 23 माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व शैक्षणिक संस्था व शिक्षकांसाठी सहा वर्षाचा शैक्षणिक विकास कृती आराखडा तयार केलेला आहे शिक्षक व शिक्षण संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक व शैक्षणिक सोयीसुविधा या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जात आहेत प्रत्येक तालुक्यातील संपर्क व समन्वयासाठी एका शिक्षक का वरच जबाबदारी देण्यात आली असून शिक्षकांनी आपल्या तालुक्यातील समन्वयक शिक्षकामार्फत आपल्या अडचणी सोडवून देण्याचे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.




आमदार सत्यजित तांबे यांच्या 2023 ते 2025 या दोन वर्षातील विकास कामांच्या  स्मरणिकेचे ही  यावेळी वितरण करण्यात आले.
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सहसचिव अरुण बोरनरे, कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण निळकंठ, योगेश सावळा, संभाजी आरोटे, प्राध्यापक संजय दीघे व किरण दिघे  हे मान्यवर उपस्थित होते.



कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ. अनिता धनक यांनी केले प्राचार्य काशिनाथ लवाटे डॉक्टर हिरालाल महानुभव सरपंच बाळासाहेब आहेर, यांची यावेळी भाषणे झाली. प्राध्यापक ललित जगताप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन प्राध्यापक उमेश बोधर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!