"धोकादायक ट्रानसफॉर्मर मुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका"
कोपरगाव समाचार :-- कोपरगाव येथील तहसील कार्यालय जवळ टिळक नगरच्या जवळ असलेला असलेला ट्रान्सफॉर्मर धोकादायक बनला असुन या ट्रान्सफॉर्मर मुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असुन या ट्रान्सफार्मरला संरक्षक जाळी लावावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे ॲड नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,कोपरगाव तहसील कार्यालय रोडवर टिळक नगर येथे असलेला ट्रान्सफॉर्मर धोकादायक बनला आहे. या ट्रान्सफॉर्मरला झाकण नाही याच ठिकाणी नगर पालिकेच्या माधवराव आढाव शाळेची दुरुस्ती सूरू असल्याने विद्यार्थ्यांना रोज एस टी महामंडळाच्या बस मधून दूसरी कडे ने आण केली जाते. बस येई पर्यंत अनेक पालक मुलांना सकाळी संध्याकाळी आणून सोडतात.
मागील काही वर्षांपूर्वी तत्कालीन ऊर्जा मंत्री चंद्र शेखर बावनकुळे यांनी शहरातील वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते मात्र अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे नुकत्याच झालेल्या नगर पालिका निवडणुक प्रचारा दरम्यान विद्यमान महसूल मंत्री चंद्र शेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येईल असे सुचोवात केले मात्र कोपरगाव शहरातील अनेक ट्रान्सफॉर्मर धोकादायक बनले आहेत.
या ट्रान्सफॉर्मर जवळ अनेक लहान मुले शाळेत जाण्यासाठी जमा झाले होते.त्याच वेळी शहरातील वीज मंडळाच्या कार्यालया तील कर्मचारी वसुली पथक या भागात वसुली साठी आले असता त्यांना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले व वरिष्ठांना कळवावे असे सांगितले असता. वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी उलट सुलट उत्तरे दिली.
राहणे नावाच्या कर्मचाऱ्याने तुम्ही स्वतः वरिष्ठांना मागणी करा आमचे हातात काही नाही विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणी जायला सांगितले अशी बेजबाबदार उत्तरे दिली. तसेच या ठिकाणी शाळेच्या शिक्षकांना या बाबत वीज मंडळाच्या कार्यालयात लेखी तक्रार करावी असे सांगितले असता आम्ही वारंवार पाठपुरावा केला असल्याचे सांगितले नुकतेच संक्रांतीच्या काळात वीज वहिनीचा शॉक लागून एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन अशा धोकादायक ट्रानसफॉर्मरला त्वरित संरक्षण जाळी बसवावी असे या पत्रकात पोळ यांनी म्हटले आहे




