बाल आनंद मेळाव्यास रवंदे ग्रामस्थांचा प्रतिसाद
कोपरगांव समाचार :-- तालुक्यातील रवंदे येथील पी.एम.श्री.जिल्हा परिषद केंद्रशाळेत शनिवारी बाल आनंद मेळावा आयोजीत करण्यात आला होता. पालक व गावातील ग्रामस्थांनी ग्राहक बनुन चिमुरड्या दुकानदारांनी विक्रीस ठेवलेल्या मालाची खरेदी करुन बाल आनंद मेळाव्यास प्रतिसाद दिला.
याप्रसंगी इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्य्थांनी विविध प्रकारची फळे,भाजीपाला,खाद्यपदार्थ,व शालेय साहित्य यांची दुकाने थाटली होती.जणु काही शनिवारी जिल्हा परिषद शाळेत आठवडे बाजार भरला होता.असे चित्र दिसुन येत होते.बाल आनंद मेळाव्यात खरेदीदार म्हणुन गावातील नागरीक,दुकानदार,पालक,महिला शिक्षिका,शिक्षक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रणाणात आपला सहभाग नोंदवित या बाल आनंद मेळाव्यात चिमुकल्या व्यापार्यांनी वीस ते पंचवीस हजार रुपयांची उलाढाल केली.
मुलांना एक आगळावेगळा आणी नावीन्यपुर्ण उपक्रम अनुभव देण्यासाठी तसेच मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी त्याचबरोबर प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांनी सांगीतले.या बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन रवंदे गावचे उपसरपंच ऋषिकेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे,आनंदराव कदम,भाऊसाहेब घोटेकर,गणेश घायतडकर,दत्तात्रय शिंदे,शशिकांत घायतडकर,गणेश काळे,रविंद्र घायतडकर,संजय कंक्राळे आदी अदाधिकार्यांसह ग्रामविकास अधिकारी राजेंद्र बागले,ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावातील शिक्षण प्रेमी नागरीक उपस्थित होते.सदर मेळाव्याव्याचे प्रास्तविक शिक्षक अशोक कानडे यांनी केले.सदर मेळाव्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.





