banner ads

सोमवारी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण व सेवा शपथ सोहळा

kopargaonsamachar
0


सोमवारी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण व सेवा शपथ सोहळा

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

कोपरगाव समाचार :-- कोपरगाव शहराच्या राजकीय व सामाजिक इतिहासात एक महत्त्वाचा क्षण म्हणून सोमवारी दि. ५ जानेवारी २०२६ रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण व सेवा शपथ सोहळा पार पडणार आहे. तहसील मैदान, कोपरगाव येथे सायंकाळी ४.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.



या सोहळ्यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग शिवाजीराव संधान यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उमेदवार हे सेवा शपथ घेऊन आपल्या कार्यकाळाची अधिकृत सुरुवात करणार आहेत. कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार या माध्यमातून व्यक्त केला जाणार आहे.



कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे भूषवणार असून मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून बिपीनदादा कोल्हे, मा.आ.स्नेहलता कोल्हे तसेच युवानेते विवेक कोल्हे यांची उपस्थिती लाभणार आहे.हा पदग्रहण सोहळा केवळ शपथविधीपुरता मर्यादित न राहता, कोपरगाव शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकाभिमुख प्रशासन या विषयांना प्राधान्य देत शहराला आधुनिक, स्वच्छ व समृद्ध बनवण्याचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी हा सोहळा महत्वाचा ठरणार आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी माजी पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक व निमंत्रक भारतीय जनता पार्टी, आघाडी व मित्रपक्ष, कोपरगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!