banner ads

कोपरगावात उद्या होणार निवडणुकीचा निकाल ठरवणारी सभा

kopargaonsamachar
0

कोपरगावात उद्या होणार निवडणुकीचा निकाल ठरवणारी सभा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे 
कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि लोकसेवा आघाडीने प्रचाराचा धडाका वाढवला आहे. या आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य प्रचार सभा सोमवार २४ नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे ४.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पराग संधान तसेच सर्व प्रभागातील उमेदवारांनी कोपरगावकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने रस्ते, पाणी, रोजगार, स्वच्छ प्रशासन आणि पायाभूत सुविधा या महत्त्वाच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी राज्य सरकारचे सक्षम पाठबळ अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही सभा अत्यंत मोलाची ठरणार आहे. शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या मोठ्या प्रकल्पांना गती देणे, प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि नव्या विकास आराखड्याची दिशा स्पष्ट करण्याबाबत मुख्यमंत्री कोणती भूमिका मांडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनातून कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वांच्या स्वप्नातील कोल्हे कुटुंबाचे शहरासाठीचे व्हिजन जनतेच्या विश्वासाने आणि मुख्यमंत्र्यांच्या ठोस पाठबळाने प्रत्यक्षात आकार घेणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
कोपरगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही सभा निर्णायक मानली जात असून, बदलत्या राजकीय घडामोडींवर मुख्यमंत्री कोणते स्पष्ट संदेश देतील, याकडे संपूर्ण कोपरगावकरांचे उत्सुकतेने लक्ष लागले आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!