संजीवनी पॉलीटेक्निक ‘बेस्ट इन्स्टीट्यूट ’ पुरस्काराने सन्मानित
्संजीवनीच्या शिरपेचात अधिकचा मानाचा तुराकोपरगांव समाचार / लक्ष्मण वावरे
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी के. बी.पी.पॉलीटेक्निकला इंडियन इंस्टिट्यूट फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आखिल भारतीय पातळीवर कार्यकरणाऱ्या संस्थेच्या महाराष्ट्र व गोवा विभागातुन ‘बेस्ट इन्स्टिट्युट (डीप्लोमा रूरल)’ पुरस्काराने गौरविले. संजीवनी पॉलीटेक्निक विविध क्षेत्रात उच्चांकी कीर्तिमान स्थापित करून ग्रामीण भागात असुनही सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. या पुरस्कारने संजीवनीच्या शिरपेचात अधिकचा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की संस्थेचे प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी आयएसटीईचे चेअरमन डॉ. रणजित सावंत यांचे हस्ते व सचिव प्रा. के.पी. कुंभार, अध्यक्ष श्री प्रतापसिंह देसाई (नवी दिल्ली) व पुणे विभागाच्या तंत्रशिक्षणालय विभागाचे जॉईंट डायरेक्टर डॉ. दत्तात्रय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्र आणि गोवा मध्ये ग्रामीण भागात सुमारे ४०० पॉलीटेक्निक आहेत. त्यातुन तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात आघाडीचे कार्य असणाऱ्या संस्थेने संजीवनीला ‘बेस्ट इन्स्टिट्युट ’ ने सन्मानित करण्यात यावे, ही बाब खऱ्या अर्थाने संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांना आदरांजली ठरणारी आहे. संजीवनी पॉलीटेक्निक हे आयएसटीईचे अनेक वर्षांपासून सभासद आहे. त्यामुळे या पॉलीटेक्निकने आयएसटीई अंतर्गत अनेक स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. याचीही पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली आहे.
संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्राचार्य मिरीकर आयएसटीई समन्वयक डॉ. संदेश तनपुरे, सर्व विभाग प्रमुख, सर्व डीन्स, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे या अभुतपूर्व उपलब्धीबाबत अभिनंदन केले आहे.

स्व. शंकरराव कोल्हे यांनी १९८२ साली संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अंतर्गत संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निक ही प्रहिली संस्था स्थापन केली. इ. १० वी नंतर तीनच वर्षात ग्रामीण भागातील मुलामुलींनी स्वयंपुर्ण व्हावे, हा त्यांचा हेतू होता.आणि झाले तसेच. आज कोपरगावसह शेजारच्या तालुक्यातील जवळपास प्रत्येक खेड्यात संजीवनीतुन बाहेर पडलेले व उद्योजक अथवा नेाकरदार झालेले तरूण तरूणी दिसतात. स्व. कोल्हे यांनी सुरूवातीपासुन जी शैक्षणिक आचारसंहिता घालुन दिली, तिचे काटेकोर पालन आजही संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे. याची परीणिती म्हणुन संजीवनी पॉलीटेक्निक ही विनाअनुदानित वर्गवरीतील महाराष्ट्रातील पहिली ‘ऑटोनॉमस’ दर्जा प्राप्त संस्था ठरली आहे. याच बरोबर या पॉलीटेक्निकच्या सर्व विभागांना सलग १२ वर्षांचे एनबीए मानांकन , एआयसीटीई कडून प्राप्त झालेला ‘क्लीन अँड स्मार्ट कॅम्पस’ देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, कोलकता कडून देश पातळीपरील ‘एक्सलन्स पॉलीटेक्निक’ पुरस्कार, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ अनएडेड पॉलीटेक्निक्स कडून प्राप्त झालेला ‘बेस्ट पॉलीटेक्निक’ पुरस्कार तसेच क्रीडा क्षेत्रातील नेत्रदिपक कामगिरी, अशा अनेक बाबतीत सन्मान मिळविला आहे. आयएसटीई कडून प्राप्त झालेला हा पुरस्कार संस्थचे संस्थापक, माजी मंत्री, सहकाराचे आधारवड व सामाजिक-आर्थिक क्रांतीचे प्रणेते स्व. शंकरराव कोल्हे यांना आम्ही समर्पित करीत आहोत
अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी