केलेल्या समाजकारणाची कोपरगावचे सुज्ञ मतदार निश्चितपणे दखल घेतील -- काका कोयटे
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून मला भक्कम साथ आणि विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व मला मिळाले आहे. राजकारणातील प्रामाणिक परीवार म्हणून काळे परीवाराकडे पहिले जाते. पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांला बळ देवून त्याला उभे करणारे व कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळणारे काळे कुटुंब आहे. अशा कुटुंबाकडून मला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला आणि कोपरगावच्या विकासासाठी मी पुन्हा राजकारणात सक्रीय झालो आहे. गेल्या काही वर्षापासून मी राजकारणातून दूर गेलो असलो तरी समाजकारणात मी सातत्याने सक्रीय होतो. त्यामुळे आजवरच्या आयुष्यात केलेल्या समाजकारणाची कोपरगावचे सुज्ञ मतदार निश्चितपणे दखल घेतील याचा मला विश्वास आहे. माझा विजय निश्चित असून राज्याचे उपमुख्यमंत्री .अजित पवार यांच्या सहकार्यातून आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलवू टाकणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शुक्रवार (दि.२८) रोजी मा.आ.अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजीत पवार यांची जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मला राजकारणात काही धोके मिळाले होते. गद्दारी अनुभवायला मिळाली, माझ्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसले गेले. मतमोजणीच्या वेळी लाईट कश्या घालविल्या गेल्या, माझ्या मतपत्रिका कशा पळविण्यात आल्या हे सगळ कोपरगावकरांना माहिती आहे असे धोके मिळाल्यामुळे मी राजकारणापासून लांब गेलो होतो.
मी जरी राजकारणापासून लांब गेलो होतो परंतु मी कधीही समाजकारणापासून लांब गेलो नव्हतो. हे कोपरगाव अनुभवत आहे ते मला सांगायची गरज नाही. जे काम करायचं, ते काम दर्जेदार करायचे हेच व्रत मी घेतलेले आहे. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात साडेतीन महिने हजारो डबे नागरिकांना घर पोहोच केले आहे. आज देखील शेकडो निराधार व्यक्तींना डबे माझ्या माध्यमातून देले जात आहे. मी माझ्या भागात अनेक देवदेवतांचे मंदिर उभारले त्याच बरोबर कोपरगाव बस स्थानकावर मी माणुसकीचे मंदिर उभारले, उद्योग मंदिर उभारले आहे. हे मी केलेले सामाजिक कामे निवडणूक लढवण्यासाठी केले नव्हते. कोपरगावकरांचा माझ्यावर विश्वास असून कोपरगावकर मला कधी विसरणार नाही. शहरातील रस्त्यावर बसलेल्या छोट्या मोठ्या दुकानदारांना आम्ही अभय देणार आहे त्यातील कोणत्याही दुकानदारांना आम्ही उठवणार नाही.कोपरगाव शहरात म्हाडाच्या माध्यमातून गोरगरिबांना घरे देऊन आ.आशुतोष काळेंच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराचा न भूतो न भविष्यती विकास करायचा असल्याचे काका कोयटे यांनी यावेळी सांगितले.




