banner ads

कोपरगाव नगरपालिकेची सत्ता विकास करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला द्या -आ.आशुतोष काळे

kopargaonsamachar
0

 

कोपरगाव नगरपालिकेची सत्ता विकास करणाऱ्या
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला द्या -आ.आशुतोष काळे


 कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
कोपरगाव शहराच्या विकासासाठी आणि कोपरगावच्या उज्वल भविष्यासाठी कोपरगाव नगरपरिषद निवडणूक कोपरगावच्या सुज्ञ मतदारांसाठी सुवर्णसंधी आहे. शहरातील रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता आणि महत्वाच्या पायाभूत सुविधा असे अनेक ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी महायुती शासनाचे पाठबळ कोपरगाव नगरपालिकेला मिळणार आहे. या बरोबरच शहराच्या विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि नवीन विकास आराखड्याना दिशा देण्यासाठी विकासासाठी व आवश्यक असलेल्या मोठ-मोठ्या विकास कामांना निधी मिळविण्यासाठी मी खंबीर  आहे.आपले कोपरगाव शहर विकसित शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकांवर घेवून जायचे आहे त्यासाठी येत्या दोन तारखेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष नगरसेवकांच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देवून कोपरगाव नगरपालिकेची सत्ता हि विकास करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला द्या असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरातील प्र.क्र.०६ मध्ये मतदारांशी संवाद साधताना आ.आशुतोष काळे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे, तसेच नगरसेवकपदाचे उमेदवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, नागरिकांना केवळ घोषणा ऐकायच्या नाहीत आजवर विरोधकांनी फक्त घोषणाच केल्या त्यामुळे कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत मागे पडले होते. परंतु २०१९ पासून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी केलेल्या प्रयत्नातून पाणी प्रश्न सुटला असून शहराचा विकास साधण्यात यश मिळाले. रस्त्यांचा झालेला विकास, शहर सुशोभिकरण, उभी राहत असलेले व्यापारी संकुल, होणारी भूमिगत गटारी असा विकास कोपरगावची जनता पाहत आहे अनुभवत आहे. जरी एवढा विकास झाला असला व त्यामुळे निश्चितपणे कोपरगाव शहराच्या बाजारपेठेची मरगळ झटकली असली तरी विकसित शहरांच्या तुलनेत कोपरगाव शहर अजून खूप मागे आहोत.
आपल्या शेजारची शहरे विकासाच्या बाबतीत केव्हाच पुढे निघून गेली आहे. त्या शहराचा झालेला नियोजनबद्ध विकास, बाहेरून येणाऱ्या नागरीकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा अशा अनेक गोष्टींच्या बाबतीत कोपरगाव शहरात विकासात्मक मोठे बदल करावे लागणार आहे. जेव्हा बाहेरून येणाऱ्या नागरीकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मिळतील त्यावेळी इतर विकसित शहराच्या गजबजलेल्या बाजारपेठे प्रमाणे कोपरगाव शहराची बाजारपेठ देखील नेहमीच गजबजलेली राहील.कोपरगाव मतदार संघ आणि कोपरगाव शहराच्या विकासासाठी महायुती शासनाची नेहमीच मदत मिळत आहे.कोपरगावच्या विकासाचे जेवढे प्रश्न घेवून जावू ते विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार हे निधी देण्यासाठी सदैव तत्पर आहेत.परंतु आणलेल्या निधीतून जास्तीत जास्त विकासकामे कशी होतील व नागरीकांच्या अडचणी दूर कशा होतील त्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला कोपरगाव शहर विकसित शहराच्या पंक्तीत नेवून बसवायचे आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे व राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना मतदानरुपी आशीर्वाद देवून मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!