काका कोयटे यांना सुरुंग लागला ते निवाऱ्यातच पिछाडीवर पडतील - रेणुका कोल्हे
यापूर्वी तुमचे व्हिजन कुठे दडून ठेवलेले होते -- पराग संधान
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
प्रभाग क्रमांक तीन मध्ये स्वतःचा बालेकिल्ला समजणाऱ्या काका कोयटे यांना सुरुंग लागला असून ते निवाऱ्यातच पिछाडीवर पडतील अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांना ठोस सोयी सुविधा देण्यामध्ये ते कमी पडलेले असून नागरिक आमच्याशी बोलताना त्यांची कशी फसवणूक झालेली आहे याबद्दल भावना व्यक्त करता आहेत. निवारा भागातील नागरिकांच्या घरांची अवस्था अतिशय खराब असून त्यांना घराचे लेआउट आणि उतारे नसल्यामुळे राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत दुर्दैवाने हा प्रश्न वर्षानुवर्ष रखडत ठेवत स्थानिक नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या उमेदवाराला यंदा घरचा आहेर देणार असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहे असा विश्वास रेणुका कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.
प्रभाग तीन मध्ये प्रचार फ्री च्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी पराग संधान यांनी विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर ती मुख्य बाजारपेठेत कुठेही तुमच्या नेत्यांसह तुम्ही चर्चेला या आम्ही चर्चाला यायला तयार आहोत असे आव्हान दिले आहे. जर विकासाची दृष्टी तुमच्याकडे होती तर 25 वर्ष तेच प्रश्न सोडवण्यासाठी आज तुम्ही ज्यांच्या बरोबर आहात तेच कुटुंब सोळा वर्षे सत्तेत आहे. यापूर्वी तुमचे व्हिजन कुठे दडून ठेवलेले होते हा प्रश्न निर्माण होतो.
प्रतिस्पर्धी उमेदवाराने केवळ निवडणुकीपूर्ती भुलथाप देणे संयुक्तिक नाही. मी 24 तास 12 महिने गेली दहा वर्षापासून रोज जनतेत आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये मैदानात आहे. आम्ही काय सामाजिक काम केले हे जनतेच्या समोर आहे मात्र तुम्ही जे सामाजिक काम केल्याचं दाखवतात त्या पाठीमागची खरी वस्तुस्थिती जनतेसमोर आहे.
दर्जेदार रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता, महिला भगिनींसाठी स्वच्छतागृह, सामान्य जनतेच्या जनजीवनाशी निगडित विविध योजना, स्वच्छ आणि पारदर्शक कारभार हा आमचा नारा असून भौतिक सोयीसुविधा आणि विविध नाविन्यपूर्ण संकल्पना आमच्या विश्वास नामामध्ये आम्ही मांडले आहेत जो विश्वास नामा जनतेनेही स्वीकारला आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित असून निवारा भागातून ऐतिहासिक मताधिक्य भारतीय जनता पार्टी उमेदवारांना मिळेल असे वातावरण असल्याचे संधान म्हणाले.




