banner ads

संजीवनी इंटरनॅशनलचा मुलांचा सुवर्णपदक विजेता संघ करणार अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व

kopargaonsamachar
0

 संजीवनी इंटरनॅशनलचा मुलांचा सुवर्णपदक विजेता संघ करणार अहिल्यानगर जिल्ह्याचे  नेतृत्व

कोपरगांव समाचार / लक्ष्मण वावरे 
अहिल्यानगर येथे नुकत्याच जिल्हा स्तरीय १४ वर्षे  वयोगटांतर्गत बेसबॉल स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलने अद्वीतिय खेळाचे प्रदर्शन  करत मुलांच्या संघाने सवुर्ण पदकाची कमाई केली तर मुलींच्या संघाने रौप्य पदकाची कमाई करून संजीवनी इंटरनॅशनल स्कूल क्रीडा क्षेत्रातही आघाडीवर असल्याचे अधोरेखित केले आहे. आता पुणे येथे ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या  विभागीय स्पर्धांमध्ये मुलांचा संघ अहिल्यानगर जिल्ह्याचे  नेतृत्व करणार असुन तेथेही जिंकायचेच, या इर्षेने  खेळाडू सराव करीत आहेत, अशी  माहिती स्कूलने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
          पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांच्या संघाने उपान्त्यपूर्व सामन्यात संजीवनी सैनिकी स्कूलच्या संघा विरूध्द १२- ०५ अशा  गुणांनी विजय संपादन केला व नंतर उपान्त्य फेरीत संजीवनी अकॅडमी, कोपरगांव विरूध्द ०९-०१  असा विजय प्राप्त करून थेट अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम चुरशीच्या  सामन्यात आबासाहेब काकडे या शेवगाच्या संघावर दमदार चढाई करीत ११-०० असा एकतर्फी सामना जिंकून सुवर्ण पदकावर आपली मोहर उमटवली. संजीवनी इंटरनॅशनल  स्कूलने मुलींच्या सामन्यात उपान्त्य फेरीत आबासाहेब काकडे विद्यालयाच्या संघाबरोबर निकरीची झुंज देत रौप्य पदक मिळविले.
          मुलांच्या सुवर्ण पदक विजेत्या संघात विराट अनिल पवार, उदयराज मिलींद शेळके,धु्रव राजु पोरंडळा, अनिरूध्द निलेश  गोंदकर,श्रीहरी गणेश  तंटक, समर्थ सदाशिव  गोंदकर, अर्चित सुनिल पानगव्हाणे, रूद्रांश  पंकज माळी, मनन यश  लोहाडे, श्रीजय निखिल बोरावके, चैतन्य मुकूंद डहाळे,राजवीर प्रशांत  कडू, ज्ञानेश  पवन भुतडा, कृष्णा नितिन घोलप व अद्वैत अच्युत फोफसे यांनी उत्कृष्ट  खेळाचे प्रदर्शन  केले.
          मुलींच्या संघात राजविका अमित कोल्हे, रितिका रविंद्र गोंदकर,देवयानी निलेश  होन, साईशा प्रशांत  होन, तन्वी अतुल गोंदकर,अक्षदा भ अक्षदा सुनिल पानगव्हाणे, पिहू पकंज मोटे,समन्वी सुनिल शिंदे , आद्या आनंद काळे,आराध्या सचिन शिंदे , संस्कृती गाडेकर, तीर्था सयाजी कडू व सानवी गणेश  विखे यांनी आपल्या क्रीडा कौशल्याचा कस लावला.
               संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या दोनही संघांचे व क्रीडा प्रशिक्षक  विरूपक्ष रेड्डी व आकांक्षा पाखळे यांचे अभिनंदन केले. तर संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी दोनही संघाचा सत्कार केला. यावेळी प्राचार्या रीना राजपुत व क्रीडा प्रशिक्षक  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!