banner ads

हद्दवाढ भाग शहरात जोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मतदानातून आशीर्वाद द्या- स्नेहलता कोल्हे

kopargaonsamachar
0

 हद्दवाढ भाग शहरात जोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मतदानातून आशीर्वाद द्या- स्नेहलता कोल्हे

कोपरगाव समाचार /  लक्ष्मण वावरे 
कोपरगाव शहरातील मतदारांनो, तुम्ही खूप सुज्ञ आहात. संकटाच्या काळात आपल्या सोबत कोण उभे राहते याची आठवण ठेवा. कोपरगाव शहरातील हद्दवाढीचा प्रश्न अत्यंत कठीण होता. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी वारंवार जाऊन ढिगभर फायली सादर कराव्या लागत होत्या.सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव भागातील हद्दवाढीचा प्रश्न अखेर मिटला आहे. त्यावेळी सर्व मंत्रिमंडळाने निस्वार्थ भावनेने सहकार्य केल्यामुळे हा प्रश्न कायमचा सुटला. या गोष्टीचे मोठे समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, कोपरगावातील त्रिशंकू भागाची अर्धवट प्रकरणे मार्गी लावण्यासाठी आम्ही मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा केला. हे म्हणण्याइतके सोपे काम नव्हते. विरोधकांचा दावा पूर्णपणे खोटा आहे. प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार वैभव आढाव व दीपा गिरमे हे अतिशय सुसंस्कृत नेतृत्व असून ते प्रामाणिक व समाजसेवेशी निष्ठावान आहेत. आपल्या मेहनतीतून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांना प्रभाग क्रमांक एकमधून चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन स्नेहलता कोल्हे यांनी केले.
भाजप–आरपीआय मित्र पक्ष आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पराग संधान यांच्या प्रचारानिमित्त कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील कॉर्नर सभेत कोल्हे बोलत होत्या. या वेळी प्रभाग क्रमांक एकमधील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
त्या पुढे विरोधकांवर टीका करत म्हणाल्या की, विरोधक असे सांगतात की हद्दवाढीचे श्रेय घेतात पण आमदार असताना आपण पूर्ण केलेले आहे. “काम बोलते” आम्ही दिलेली वचने पाळून त्याची अधिकृत पुस्तिका काढण्याची ताकद मला आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मिळाली. नगरपालिकेची इमारत, एसटी स्टँड, पोलीस स्टेशन, शहर व ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त वाचनालयाची इमारत, पंचायत समितीची भव्य इमारत,फायर स्टेशन, गोकुळनगरी पूल,बाजार ओटे ही सर्व विकासकामे करून नागरिकांचे प्रश्न सोडवले आणि त्यामुळे समाधान मिळाले. कोपरगाव शहरातील त्रिशंकू भागाची हद्दवाढ होत असताना खूप त्रास सहन करावा लागला. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून त्या वेळचे कलेक्टर यांच्याकडून हद्दवाढीसाठी तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घ्यावा लागला. या कामादरम्यान मोठा संघर्ष झाला.माझी विनंती आहे, तुम्ही भाजपाचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून द्या.असेही त्या म्हणाल्या.
मागील निवडणुकीवेळी आपण सर्व नगरसेवक निवडून दिले; परंतु नगराध्यक्ष पदासाठी मतदान कमी झले होते त्यामुळे आपल्याला अनेक प्रगतीच्या योजना शहरासाठी पूर्णत्वास न्यायच्या होत्या त्या नेता आल्या नाही. माझे सर्व मतदारांना आवाहन आहे की अशी गोष्ट यावेळी टाळावी लागेल सर्व उमेदवार भाजपा मित्रपक्षांचे विजयी झाले पाहिजे हे स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला. सत्ता बदलानंतर कोपरगावच्या विकासासाठी आलेल्या निधीची अत्यंत चुकीची विल्हेवाट लावल्याचा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला.
भाजप, आरपीआय व मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पराग संधान व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारसभेच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोपरगावात आले होते. त्यांनी जिल्ह्यात एकमेव कोपरगावात सभा घेतली. एक एक मत किती महत्त्वाचे आहे हे देवाभाऊंनी स्पष्ट सांगितले आहे. भाजपाच्या सर्व पॅनेलला बहुमताने विजयी करा, जेणेकरून शहराचा विकास झपाट्याने होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भाषणादरम्यान प्रभाग क्रमांक एकमधील सर्व अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले आणि नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार दीपा गिरमे व वैभव आढाव यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. कोपरगाव नगरपालिकेत भाजपा मित्रपक्षांची सत्ता आल्यास विकास अतिशय चांगल्या पद्धतीने होईल, असेही त्या म्हणाल्या.
युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोरोना काळात नागरिकांच्या सेवेसाठी तातडीने कोविड सेंटर उभारले होते. त्या केंद्राच्या उद्घाटनाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!