banner ads

शीर्षक नाही

kopargaonsamachar
0

 काळे कारखाना ऊसाला पहिली उचल प्र.मे..टन ३,०००/- रुपये देणार-आ. आशुतोष काळे

कोपरगाव समाचार /. लक्ष्मण वावरे 
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सदैव हित साधणाऱ्या व ऊस दराच्या संदर्भात स्वत:शीच स्पर्धा करून ऊस दराच्या बाबतीत नेहमीच जिल्ह्यात अग्रेसर राहिलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने २०२५/२६ च्या गळीतास येणाऱ्या उसाला प्रती मे.टन पहिली उचल एफ.आर.पी.पेक्षा जास्त सरसकट ३,०००/- रुपये देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी जाहीर केले आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम ५ नोव्हेंबरपासून नियमितपणे सुरु झाला असून २७ नोव्हेंबर अखेर १.१५ लाख मे. टन ऊसाचे गाळप झाले आहे. कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाची सभा नुकतीच संपन्न झाली. झालेल्या बैठकीत २०२५-२६ च्या सुरु असलेल्या गळीत हंगामात गाळपाला येणाऱ्या ऊसाला द्यावयाच्या ऊस दराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी आ.आशुतोष काळे यांनी सांगितले की,चालू वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे  शेतकऱ्यांचे खरीप हंगामात नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिके उभी करण्यात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.अशा परिस्थितीत हक्काचे नगदी पिक व शाश्वत दर मिळणाऱ्या ऊस पिकावर शेतकऱ्यांच्या सर्व अपेक्षा अवलंबून असतात. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ऊस पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर दिल्यास त्यांना दिलासा मिळणार आहे. त्यासाठी याहीवर्षी मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांची ऊसाला जास्तीत जास्त दर देण्याची परंपरा पुढे सुरु ठेवून ऊसाला याहीवर्षी पहिली उचल एफ.आर.पी.पेक्षा जास्त सरसकट प्रती मे.टन ३,०००/- रुपये देणार असल्याचे जाहीर केले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक दर व वेळेत पेमेंट हि परंपरा कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्यापासून माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील सुरु ठेवली आहे. हि परंपरा यापुढे देखील अबाधित राहणार आहे. पहिल्या पंधरवड्याचे ऊसाचे पेमेंट २९ नोव्हेंबर रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून त्यानंतर दर पंधरा दिवसाला नियमितपणे ऊसाचे पेमेंट शेतकऱ्यांना अदा केले जाणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने ऊस दराला पहिली उचल समाधानकारक दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.  



 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!