banner ads

निवडणुक लवकर वेळेत व्हावी ही अपेक्षा कारण गुलाल आमचाच आहे - स्नेहलता कोल्हे

kopargaonsamachar
0


निवडणुक लवकर वेळेत व्हावी ही अपेक्षा कारण गुलाल आमचाच आहे - स्नेहलता कोल्हे


" निवडणूक वेळेत घ्या, भाजप मित्र पक्षांची मागणी "

कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाप्रमाणे पुढे ढकलली जाण्याची शक्यता असल्याने भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तसेच राज्य निवडणूक आयोगाला पत्र देऊन सदर निवडणुका वेळेत पार पाडाव्या पुढे ढकलू नये अशी मागणी केली आहे. मा.आ.स्नेहलता कोल्हे यांनी निवडणूक आयोग व शासन स्तरावर मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून आमच्या मतदारसंघात कुठेही उमेदवार अपात्र किंवा न्यायालयीन प्रक्रिया सध्या सुरू नाही त्यामुळे निर्धारित वेळेत निवडणूक होऊ द्याव्यात अशी भूमिका मांडली आहे. 
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना स्नेहलता कोल्हे म्हणाल्या आज निवडणुका झाल्या तरीही आमचा गुलाल निश्चित आहे त्यामुळे विरोधकांनी खोटा अपप्रचार करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात पडू नये. अतिशय मोठ्या मताधिक्याने आमच्या सर्व उमेदवारांना नागरिक आशीर्वाद देणार असल्याने कधीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण न येणाऱ्या विरोधी उमेदवाराने स्वार्थासाठी स्मारकावर जात संविधानाचे विचार मांडल्याचे दिसले.केवळ स्वार्थासाठी यांना महापुरुष आठवतात इतर वेळी कधीही आठवण येत नाही अशी भूमिका कोल्हे यांनी मांडली आहे. 
कोपरगाव शहरात आपत्ती, अतिक्रमण वेळी लहान टपरी धारक अडचणीत आले,धार्मिक तेढ, धर्मग्रंथ विटंबना, पहिला अत्याचार, गोळीबार, कायदा सुव्यवस्था, पीएची दहशत असे प्रकार घडले यावेळी त्यांना संविधान आठवले नाही आणि भूमिका घ्यावी वाटली नाही हे दुर्दैव आहे. निवडणुकीचा अशा प्रकारचा निर्णय केवळ कोपरगाव पुरता झालेला नसून महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेला आहे अगदी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मतदारसंघात देखील अशा प्रकारच्या प्रक्रियांना सामोरे जावे लागते आहे तेव्हा विरोधकांनी त्यांच्या विरोधातही संविधानाची भूमिका घेतली असा आरोप करत भूमिका स्पष्ट करावी असे कोल्हे म्हणाल्या आहेत.
सोयीच्या भूमिका या आमदार आणि कोयटे हे घेतात अनेकदा सिद्ध झाले आहे. निवडणूक त्यांच्या हातातून निसटली आहे जनतेने भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांना स्पष्ट कौल दिलेला आहे त्यामुळे विजय आमचा निश्चित असल्याने विरोधकांना निवडणुकीची भीती वाटू लागल्याने पराभव कशाच्या आड लपवायचा यासाठी वेगवेगळे आरोप आमच्यावर करण्याचा प्रयत्न करत आहेत. 
या निवडणुका अजिबात पुढे जाऊ नये यासाठी आम्ही सर्व ते कायदेशीर प्रयत्न करत आहोत व तशी मागणी ही आयोगाकडे करत आहोत. आमचे कार्यकर्ते अतिशय जोमाने व दुपटीने कामाला लागलेले असून जेवढ्या लवकर निवडणुका होतील तेवढा आमचा विजय अधिक मोठा असणार आहे अशी ही स्पष्टोक्ती कोल्हे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!