येवल्यातील लुटमार प्रकरणी कोपरगावातील एकाला अटक
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा यासाठी पोलीस ठाणे निहाय आढावा घेऊन जिल्हा अभिलेखा वरील गुन्हेगारांचे सध्याचे ठावठिकाणाबाबत माहिती घेण्यास पोलीस पथकांना सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी लुटमार व आर्म अॕक्टचे गुन्हे उघडकीस आणून कारवाई केली आहे.
यात येवला शहरातील साई पैठणी दुकानात जाऊन फिर्यादी शब्बीर शेख व साक्षीदार यांना चाकू व तलवारीचा धाक दाखवून रोख रक्कम व दोन मोबाईल फोन असा एकूण १९००० रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी चोरी करून चोरून नेल्या बाबत येवला शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २७ / २०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (४) ,३(५) भारतीय हत्यार कायदा कलम ४/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीच्या आधारे अहिल्यानगर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार फराज एजाज सय्यद वय २२ राहणार सुभाष नगर कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यास कोपरगाव नाका परिसरातून ताब्यात घेतले. त्याचे कब्जातून वरील गुन्ह्यात चोरीस गेलेले व्हिवो व्ही २९ व रेडमी नोट १० असे दोन मोबाईल फोन किंमत रुपये १३ हजार चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपीने त्याचे साथीदार आसिफ शेख ,राहणार संजय नगर कोपरगाव ,जैदखान अमजखान पठाण, राहणार संजय नगर कोपरगाव यांच्यासह जानेवारी महिन्यात येवल्यातील एका पैठणीच्या दुकानात चाकू व तलवारीचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल फोन जबरीने चोरी केल्याची कबुली दिली आहे .यातील आरोपी फराज सय्यद हा शिर्डी पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर नंबर ३२/२०२५ भा.न्या.सं.कलम ३१०(२ ) १०९ ,३०६ ( ६ )सह भारतीय हत्यार कायदा कलम ३ /२०२५ व ४ / २५ या गुन्ह्यात देखील फरार होता त्यास नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेचे पथकाने ताब्यात घेऊन येवला शहर पोलीस ठाणेकडील वरील गुन्ह्यात अटक केली आहे सदर आरोपीचे इतर साथीदारांचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून त्यांच्याकडून जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर ,अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेजबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक हर्षद भोळे ,शिवाजी ठोंबरे ,पोलीस अंमलदार प्रवीण काकड ,रावसाहेब कांबळे यांचे पथकाने वरील गुन्हा उघड आणून कारवाई केली आहे


.jpg)



