banner ads

वाजे यांच्या भूमिकेने निवडणुकीचे समीकरण कोल्हे यांनी फिरवले

kopargaonsamachar
0

 वाजे यांच्या भूमिकेने निवडणुकीचे समीकरण कोल्हे यांनी फिरवले

 दीपक वाजेंचा पराग संधान यांना जाहीर पाठिंबा
कोपरगाव समाचार /  लक्ष्मण वावरे 
कालच मुख्यमंत्र्यांनी कोपरगावकरांना संबोधित केले. अलोट गर्दी उसळली होती.अतिशय नवचैतन्य निर्माण झाले होते. कोपरगावचे भविष्य आणि अपेक्षा या सत्यात उतरवण्यासाठी जनतेला विश्वास निर्माण आला आहे.त्यात दुग्ध शर्करा योग आला आहे.अपक्ष उमेदवार दीपक वाजे यांनी युवानेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत भाजपा मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार पराग संधान यांना पाठिंबा दिला आहे.
आकाश वाजे हे प्रभागात अपक्ष उमेदवार होते. त्यांना उमेदवारीची भाजपा मित्रपक्ष उमेदवार म्हणून संधी देत अतुल काले यांनी अतिशय मोठे मन दाखवले आहे.कोपरगाव शहराच्या जडणघडणीत योगदान असणारे अतुल काले हे प्रभाग चार मधून उमेदवार म्हणून उभे होते.आपण अनुभवी आहोत त्याचा फायदा अन्य प्रभागात होईल व यातून प्रभागात एक युवकाला संधी द्यावी व प्रवाहात आणावे या भावनेने अतुल काले यांनी आकाश वाजे यांना संधी देण्याची भूमिका घेतली आहे.या घडामोडीने अतिशय नवचैतन्य निर्माण झाले आहे. काले यांचा इतरही प्रभागात जनसंपर्क असल्याने त्यांनी सर्व प्रभागातील उमेदवारांना मताधिक्य वाढविण्यासाठी मोलाची भूमिका घेतली आहे. यावेळी कोल्हे परिवाराच्या वतीने काले परिवाराचे आभार विवेक कोल्हे यांनी मानले
समाजकारण करण्याची आवड मला आहे, माझी एकच मागणी होती आमच्या प्रभागातील अनेकांच्या घरांचा आणि जागेचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे.यामुळे माझा अर्ज मी मागे घेतोय व पराग संधान यांना पाठिंबा जाहीर करतो आहे.सन २०१०/११ मध्ये अतिक्रमण झाले त्यावेळी आमच्या भागातील ६७० घरे पाडले गेले होते, त्या कुटुंबांचा प्रश्न सुटणे गरजेचे होते,यासाठी विवेक कोल्हे यांनी सदर प्रकारात लक्ष घालून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी मार्गी लावण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे आमचा प्रश्न सुटणार आहे हा विश्वास आहे. गरिबांचे घरे व्हावे यासाठी कोल्हे परिवाराने केलेला पाठपुरावा व अनेक वर्षांचे ऋणानुबंध विचारात घेऊन आम्ही पराग संधान यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मनाचा मोठेपणा दाखवत दीपक वाजे यांनी पाठिंबा दिला,आणि अतुल काले यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत पराग संधान यांनी केले.यासह भविष्यात सर्वांचे काम हे आपले काम समजून प्रामाणिकपणे पूर्ण करणार हा विश्वास संधान यांनी सर्वांना दिला.कोल्हे गटाचे पारडे आधीच जड असताना या घडामोडीमुळे भर पडल्याने मोठा धक्का विरोधकांना बसला आहे.सर्व प्रभागात वाजे यांनी केलेला प्रचार आता थेट संधान यांच्या बाजूने झुकला जाणार आहे त्यामुळे ताकद एकवटून भाजपाचे कमळ फुलणार हे जवळपास निश्चित झाले आहे.यातून प्रभाग तीन व चार आणि शहरात विविध भागात गणित फिरणार असून राजकीय जाणकारांच्या मते आता कोयटे यांचा पराजय जवळपास निश्चित मानला जातो आहे. वाजे यांच्या भूमिकेने निवडणुकीचे समीकरण कोल्हे यांनी फिरवले असून कोल्हे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!