ए. आय ही तंत्रज्ञानातील मोठी चळवळ” - मा.ॲड भगीरथ शिंदे
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
: “रयत शिक्षण संस्था ही संपूर्ण देशामध्ये ए. आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) सुरू करणारी एकमेव संस्था आहे. रयतच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधीष्टीत शिक्षण मिळावे, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. आज रयतच्या ६५०० वर्ग खोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसविले आहे. त्यामुळे रयतच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाची ओळख होते आहे.” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.ॲड भगीरथ शिंदे यांनी केले.
ते कोपरगाव येथील सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँण्ड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयाच्या नव्याने स्थित झालेल्या ए. आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ते म्हणाले की, “ज्ञानाचे हस्तांतरण महत्वाचे असून शिक्षण ही एक त्यातली गोष्ट आहे. आजच्या काळात ए. आय. तंत्रज्ञानाबद्दलची शंका-कुशंका, संशोधन, रिसर्च पेपर, प्रकाशनपद्धत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ही काळाजी गरज आहे,त्यामुळे या बदलांना रयतच्या विद्यार्थ्यांनी आणि सेवकांनी स्वीकारावे.” अशी अपेक्षा याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक व उद्घाटनपर मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून महाविद्यालयाचे नॅकच्या अनुषंगाने आवश्यक असलेले ध्येय आणि धोरण निश्चित केलेले आहे. तसेच रयतच्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हा उद्देश ठेवत ही प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी मा. ॲड भगीरथ शिंदे यांच्या पुढाकार व मार्गदर्शनाने घेतला असल्याचे स्पष्ट केले.”
सदर कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य .डॉ.सुजित गुंजाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महेंद्र काले, महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य संजय शिंदे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश मालपुरे, कार्यालयीन अधीक्षक . सुनिल गोसावी, ए.आय. समन्वयक प्रा.प्रतीक्षा रोहोम, प्रा. रवींद्र हिंगे,प्रा. अनिल गायकवाड, महाविद्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सीमा दाभाडे यांनी केले.




