banner ads

संजीवनी विद्यापीठाचा आयआयएम, नागपुरशी सामंजस्य करार

kopargaonsamachar
0

 संजीवनी विद्यापीठाचा आयआयएम, नागपुरशी  सामंजस्य करार

एमबीए, बीबीए व बॉ.कॉम शिक्षणाला आता जागतिक दर्जाची  जोड
कोपरगांव समाचार / लक्ष्मण वावरे 
आपल्या विद्यार्थ्यांना वर्ल्ड क्लास शिक्षण  मिळावे व ते या महाकाय विश्वात  चांगल्या प्रकारे स्थिर स्थावर व्हावे, हा संजीवनी विद्यापीठाचा नेहमीच ध्यास असतो. याचाच एक भाग म्हणुन संजीवनी विद्यापीठाने नागपुर येथिल आयआयएम (इंडियन इन्स्टिटयूट  ऑफ मॅनेजमेंट) या संस्थेशी  सामंजस्य करार (एमओयु) करून आपल्या अध्यापन क्षेत्राला एक अधिकचा आयाम दिला आहे. आयआयएम, नागपुर ही देशातील  नामांकित संस्था आहे. तसेच कॅनडा मधिल आयव्ही ही व्यवस्थापन शास्त्रातील  आघाडीची संस्था आहे. एमओयु मार्फत संजीवनी विद्यापीठ व आयआयएम, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयव्ही पब्लीशिंग  सेंटर, कॅनडा येथे सदर केसेस पब्लीश  करून त्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात  येणार आहे.  यामुळे एमबीए, बीबीए व कॉम शिक्षणाला  जागतिक दर्जाची जोड मिळून बिझिनेसच्या ज्या केस स्टडी असतात, त्या विद्यार्थ्यांना चांगल्या अवगत होणार आहेत, अशी माहिती संजीवनी विद्यापीठाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
        नागपुर येथे आयआयएम केस रिसर्च सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी या एमओयुवर स्वाक्षऱ्या  करण्यात आल्या. संजीवनी विद्यापीठाच्या वतीने प्रेसिडेंट  अमित कोल्हे, व्हाईस चांसलर डॉ. ए.जी.ठाकुर आणि डीन डॉ. व्ही. आर. मालकर तर आयआयएम कडून संचालक डॉ. भिमराय मेत्री, केस रिसर्च सेंटरचे डॉ. राकेश  गुप्ता, उत्पादन आणि प्रसारण  संचालिका श्रीमती व्हायोलेट गॅलाधर उपस्थित होते.
           या एमओयु मुळे जागतिक मानक आधारीत शिक्षण  थेट संजीवनमध्ये पोहचणार आहे. विद्यार्थ्यांना मजबुत विश्लेणात्मक , निर्णयक्षमता आणि वास्तविक जागतिक समस्या सोडविण्याची कौशल्ये यामुळे प्रदान होतील. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!