आरोग्याच्या सुविधा हा विकासाचा आधारस्तंभ--- मा.आ.स्नेहलता कोल्हे
कोपरगाव समाचार/ लक्ष्मण वावरे
आरोग्य केंद्रे आणि सुविधा हा विकासाचा आधारस्तंभ आहे कारण त्यातून नागरिकांचे आरोग्य सुधारते आणि राष्ट्रीय विकासाला चालना मिळते. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करणे, आजारांचे लवकर निदान करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे यासाठी ही केंद्रे महत्त्वाची असुन गाव, तेव्हाच खऱ्या अर्थाने विकसित होते, जेव्हा तिथले नागरिक शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ असतात. आरोग्याच्या सुविधा हा विकासाचा आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन मा.आ.स्नेहलता कोल्हे यांनी केले.
येसंगाव येथे केंद्रीय १५ व्या वित्त आयोग योजने अंतर्गत रुपये 43 लक्ष खर्चाच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकाम कामाचा शुभारंभ मा.आ.स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी त्या बोलत होत्या .या प्रसंगी ज्ञानदेव गायकवाड, चंद्रकांत शिवरकर, शिवाजी कोकाटे, गोरख आहेर, गणेश राहणे, बापूसाहेब सुराळकर, सरपंच पुंडलिक गांगुर्डे, उपसरपंच संदीपराव गायकवाड, अतुल सुराळकर, किरण गायकवाड, अमोल झावरे, कपिल सुराळकर, सतिष गोसावी, सोसायटी सदस्य सुभाषराव गायकवाड, डॉ अनिकेत खोत टाकळी, प्रशांत सुराळकर, दत्तात्रय आहेर, निलेश वराडे, सचिन गायकवाड, दिनेश कोल्हे,. दगडू दरेकर , किरण कारभारी गायकवाड, रामदास गायकवाड, आरोग्य सहाय्यक थोरात आरोग्य सहाय्यक श्री गवई,आरोग्य सेवक श्री सिंगल ,डॉ पठाण मॅडम ( वैद्यकीय अधिकारी) टाकळी, डॉ लिपाने मॅडम (CHO) येसगाव, सर्व आशा सेविका ,अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत अधिकारी सिद्धार्थ काळे, कॉन्ट्रॅक्टर मच्छिंद्र सानप,आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मा.आ. कोल्हे म्हणाल्या की या ४३ लाख रुपयांच्या निधीमुळे, येसंगाव येथे एक आधुनिक आणि सर्वसुविधांनी युक्त असे आरोग्य उपकेंद्र उभे राहणार आहे.हे काम आपल्या गावाच्या उज्वल भविष्याची आणि आरोग्यपूर्ण जीवनाची पायाभरणी आहे हे कार्य लवकरच पूर्ण होऊन, गावकऱ्यांच्या सेवेत रुजू होईल असे सांगितले.





