banner ads

उक्कडगावला मिळाला विकासाचा नवा आयाम

kopargaonsamachar
0

 उक्कडगावला मिळाला विकासाचा नवा आयाम

सामाजिक सभागृहाचे लोकार्पण माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते संपन्न
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे 
उक्कडगाव येथे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळातील आमदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा मा. आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पार पडला.
आपण इथे ज्या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जमलो आहोत, ते उक्कडगावच्या एकात्मतेचे आणि सामूहिक प्रगतीचे प्रतीक आहे.एका चांगल्या विचारातून, एका चांगल्या कामातून, एका चांगल्या जागेची निर्मिती झाली आहे.
आपल्या गावकऱ्यांना त्यांची सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्ये पार पाडता यावीत. अनेक वर्षांपासून असलेली ही मूलभूत गरज होती.आपल्या सर्वांच्या मागणीनुसार आणि आशीर्वादाने, हे सभागृह माझ्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आले आणि ते पूर्णत्वास आले याचा मला अतिशय आनंद आहे. माझ्या कार्यकाळातील प्रत्येक निधीचा विनियोग जनतेच्या हितासाठी व्हावा, हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि आज तो इथे यशस्वी झाल्याचे पाहून मन भरून आले आहे असे स्नेहलता कोल्हे म्हणाल्या आहेत.
या प्रसंगी, बबनराव (नाना) निकम, रेवणनाथ श्रीरंग निकम, हेमंत निकम,  रामदास निकम, संतोष निकम, रवी निकम, सरपंच विकास निकम, उपसरपंच बबन गोविंद निकम, सखाराम पा निकम, मदनराव निकम, दादासाहेब पा निकम, अंसाराम निकम आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!