काका कोयटे व सर्व उमेदवार येत्या तीन तारखेला खांद्यावर गुलाल घेणार -- रुपाली चाकणकर
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरेविरोधक किती हि कुरघोड्या करो, नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे व सर्व उमेदवार येत्या तीन तारखेला खांद्यावर गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर झालेल्या प्रचार सभेप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. व्यासपीठावर आ.आशुतोष काळे समवेत काका कोयटे, प्रभागनिहाय सर्व उमेदवार उपस्थित होते.
रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या, लाडकी बहिण योजना, जनसंवाद सभामध्ये आ.आशुतोष काळे यांना जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. जनतेशी वर्षानुवर्षे असलेला त्यांचा ऋणानुबंध आहे. यामुळे कोपरगावकराना वेगळे सांगायची गरज नाही. लाडकी बहिण योजना फसवी असल्याची विरोधकांनी टीका केली. मात्र विरोधक देखील लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घेत होते अशी दुतोंडी भूमिका विरोधकांनी घेतली. महिलांच्या खांद्यावरील हंडा खाली उतरविणारे आमदारांना महिला डोक्यावर घेते हे लाखाच्या मताधिक्याने दाखवून दिले आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवरील उमेदवारांना निवडून दिले पाहिजे. १६ हजार सहकारी पतसंस्थांचे १९९८ पासून काका कोयटे नेतृत्व करीत आहेत. सामाजिक संघटनेचा सलोखा ठेवत लोकांशी जनसंपर्क ठेवत त्यांनी खऱ्या अर्थाने मोठी चळवळ उभी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुशिक्षित, समाजात वेगळी ओळख असलेले उमेदवार दिले असून आपले प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष सदाभाऊ साटोटे, शिवसेना महिला आघाडीच्या (उबाठा) शहर उपाध्यक्षा सौ.आश्विनी होणे, किरण गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, हरीष कुऱ्हाडे, करण गायकवाड, प्रतिक कुऱ्हाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, नगरध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे, पद्माकांत कुदळे, राजेंद्र जाधव, कारभारी आगवन, नारायणराव मांजरे, सतीशशेठ कृष्णानी, संभाजीराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, धरमचंद बागरेचा, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, सौ.सुहासिनी कोयटे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शहराध्यक्ष सुनिल गंगुले, कृष्णा आढाव, दिनार कुदळे, विरेन बोरावके, फकीर कुरेशी, बाळासाहेब आढाव, प्रकाश दुशिंग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२०१९ ला निवडून आल्यानंतर दोनच महिन्यात पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरू केले. त्यावेळी साठवण तलाव होऊ नये व शहराचा पाणी प्रश्न मिटू नये यासाठी विरोधक न्यायालयात गेले. त्यानंतर मी मंजूर करून आणलेल्या शहरातील २८ विकासकामांना स्थगिती मिळवण्याचे पाप विरोधकांनी केले. यामागे त्यांची एवढी एकच पोट दुखी होती की त्या कामाचे श्रेय मला मिळू नये. याबाबत वेळोवेळी मी प्रसारमाध्यमांद्वारे सांगत होतो.त्याचा प्रत्यय या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आला. छाननीच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचे व त्यांच्याही सर्व उमेदवारांचेही उमेदवारी अर्ज वैध झाल्यानंतर पायाखालची जमीन सरकु लागल्यामुळे कुठलाही आधार नसतांना ते आज न्यायालयात गेले. यावरून आजपर्यंत मी त्यांच्या बाबत जे काही बोलत होतो ते त्यांनी आज सिद्ध केले आहे

-आ.आशुतोष काळे