banner ads

जनतेचा विश्वास सार्थ ठरवणारा विश्वासनामा आम्ही सत्यात उतरवू -पराग संधान

kopargaonsamachar
0

 जनतेचा विश्वास सार्थ ठरवणारा विश्वासनामा आम्ही सत्यात उतरवू -पराग संधान

 लोकप्रिय संकल्पना मांडणारा हा जनतेचा विश्वासनामा - स्नेहलता कोल्हे
कोपरगाव समाचार /. लक्ष्मण वावरे 
भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांच्या वतीने कोपरगाव नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार पराग संधान आणि सर्व प्रभागांचे उमेदवार यांच्या वतीने कलश कार्यालय येथे विश्वासनामा प्रसिद्ध करण्यात आला.यावेळी युवानेते विवेक कोल्हे व पराग संधान यांनी आपल्या स्वप्नातल आपलं कोपरगाव कसे असावे हे अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थीतीत हा प्रकाशन सोहळा पार पडला.
पारदर्शक व जबाबदार प्रशासन,रस्ते वाहतूक,पाणी पुरवठा,कचरा व्यवस्थापन,आरोग्य आणि स्वच्छता,डिजिटल सुविधा,महिला व युवक,शिक्षण,पायाभूत सुविधा,संस्कृती आणि कला असा सर्व घटकांना न्याय देणारा विश्वासनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नगरपालिका आपल्या दारी,प्रभाग वारी,लाडकी बहिण मदत कक्ष,शहराची सुकानु समिती, रोड स्विपर मशीन, सिग्नल व्यवस्था, पार्किंग,महिलांसाठी स्वच्छतागृह,रोजगार,आरोग्य सुविधेसह जेवढे पाणी तेवढे बिल ही लोकप्रिय योजना जाहीर करण्यात आली आहे.गोदावरी तिराचे सुशोभीकरण व सुविधा,नगरपालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या कुटुंबांना घरपट्टी आणि पाणी पट्टीत वीस टक्के सवलत, ज्या महिलांच्या नावावर घर असेल त्यांना घरपट्टीत पन्नास टक्के सवलत देण्याचा विचार अशा लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत आम्ही सर्व मिळून त्या सत्यात उतरवू असे संधान म्हणाले.
नागरिकांनी दिलेल्या सूचनांचा आणि अपेक्षांचा पूर्ण विचार यात करण्यात आलेला असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!