संजीवनीच्या चार विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
कोपरगांव समाचार / लक्ष्मण वावरे
ऑटोनॉमस दर्जा प्राप्त संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाने आपल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना नामंकित कंपन्यांमध्ये त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकऱ्या मिळवुन देण्याचा ध्यास घेतला आहे. याच ध्यासातुन अलिकडेच श्नायडर इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यात कंपनीने आकर्षक पॅकेज देवुन चार विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. अशा प्रकारे टी अँड पी विभागाची आपल्या विद्यार्थ्यांना अंतिम निकाला अगोदरच हातात नोकरीचे नेमणुक पत्र देण्याची परंपरा कायम ठेवली आहे, अशी माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की श्नायडर इलेक्ट्रिक इंडिया लि. या विद्युत संबधित विविध क्षेत्रात आघाडीच्या कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाच्या ऋतुजा प्रकाश भालेराव व वैष्णवी त्रिंबक संवत्सरकर यांची तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागाचे आशिष अनिल कोकाटे व ओमकार संजय भाबड यांची नोकरीसाठी निवड केली आहे.
टी अँड पी विभागा मार्फत विद्यार्थ्यांना उद्योगमानक कौशल्ये प्राप्त व्हावीत यासाठी सातत्याने विविध कंपन्यांशी संवाद ठेवत त्यांच्या उत्पादने, यंत्रसामग्री, विविध सॉफ्टवेअर्स, इत्यादी बाबींची माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहचवली जाते. मुलाखत प्रक्रियेचा भरपुर सराव करवून घेतला जातो. विद्यार्थ्यांची तयारी उत्कृष्ट झाल्याचा विश्वास पटल्यावरच कंपन्यांच्या प्रतिनिधिंना आमंत्रित केल्या जाते आणि अपेक्षित पॅकेजवर विद्यार्थ्यांची निवड होते. त्यांच्या नोकरीमुळे ग्रामीण भागाचे अर्थकारण सुधारत आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. एम.व्ही. नागरहल्ली, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डॉ. दिपेश परदेशी , मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. प्रसाद पटारे उपस्थित होते.

मी सावळीविहीर येथिल मध्यमवर्गीय कुटूंबातील मुलगी. माझे वडील कोपरगांव येथे रिक्षा चालवितात. आमच्या कुटूंबात एक बहिण व एक भाऊ असुन आई गृहिणी आहे. इ. १२ वी परीक्षा दिल्यानंतर मला पुणे येथिल इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिकण्याची इच्छा होती परंतु वडीलांनी समजाविले की आपल्या जवळ संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज हे हमखास नोकरी मिळवुन देणारे कॉलेज आहे तर पुण्याला कशासाठी जायचे ? मी सुध्दा संजीवनी बाबत चांगला अभ्यास केला आणि येथे प्रवेश घेतला. कॉलेजने माझ्या मुलाखतीची चांगली तयार करून घेतली आणि माझी श्नायडर कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. याचे श्रेय मी माझ्या कॉलेजला देते. आता माझी बहिण इ.१२ वीला आहे. तिला सुध्दा मी येथेच प्रवेश देणार आहे
.-ऋतुजा भालेराव