केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा विधायक उपक्रम
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
आत्मसात केलेल्या ज्ञानातुन समाजाची उन्नती व्हावी हा हेतु प्रत्येकांने आयुष्यात आचरणांत आणावा. केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सहकारी बांधवांच्या अडचणीत मोलाचा हातभार देवुन विधायक उपक्रम जपला असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक काशिनाथ लव्हाटे यांनी केले.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात १९९१ ते १९९८ याकाळात शिक्षण घेणा-या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी गेल्या चार वर्षापासुन दिवाळी सणानिमीत्त एकत्र येवुन अडचणीत सापडलेल्यांना एक हात मदतीचा उपक्रम राबवित असुन त्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रविवारी पार पडले त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
प्रारंभी सोमनाथ परजणे यांनी प्रास्तविक केले. माजी विद्यार्थी कै. गणेश कडलग यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली. मुख्याध्यापक काशिनाथ लव्हाटे, शिक्षक राजेंद्र झरेकर , वैभव आढाव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गत २८ वर्षातील जुन्या आठवणींना यावेळी कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे संचालक सागर शहा, अविनाश निकम, प्रगतशील शेतकरी माजी सरपंच किरण दहे आदिंनी यावेळी उजाळा देत अडचणींत सापडलेल्या आपल्या माजी सहकारी विद्यार्थ्यांना कशी आर्थीक मदत केली याची माहिती दिली. केबीपी विद्यालयातुन शिक्षण घेवुन जीवनाची दुसरी इनिंग सुरू करतांना कुणी वकील, डॉक्टर, अभियंते बनुन समाजात काम करीत आहे

पण कामाच्या निमीत्तांने हे सर्व माजी विद्यार्थी दुरावले मात्र प्रत्येक दिवाळी सणांत कोपरगांवी जमायचे आणि एक दिवस स्नेहसंमेलन साजरे करायचे या उद्देशांने हे माजी विद्यार्थी गेल्या पाच वर्षापासुन एकत्र येत आहेत त्याबद्दल अनेकांनी कौतुक केले. सागर शहा यांनी माजी विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला. शेवटी गणेश थोरात यांनी आभार मानले.