दीपावली पाडव्यानिमित्त श्री वरदविनायक दत्त मंदिरात सांज पाडवा भजनसंध्या संपन्न
दीपावली पाडवा भजनसंध्या आंतरिक ऊर्जेचे केंद्र - पराग संधान
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
विजेता तरूण मंडळ संचलित इंदिरा पथ, कोपरगाव येथील श्री वरदविनायक दत्त मंदिर येथे दीपावली पाडव्यानिमित्त सायंकाळी भजनसंध्येचे आयोजनासाठी करण्यात आले. या कार्यक्रमात कराओके सिंगर प्रा. धनंजय हंडे सर, प्रा. उल्हारे सर आणि रविंद्र उत्तमराव सुपेकर यांनी विविध भक्तिगीते, अभंग व भजन सादर करून श्री वरदविनायक आणि श्री दत्त महाराजांच्या चरणी आपली संगीत सेवा अर्पण केली. त्यांच्या सुरेल आणि दमदार सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
या प्रसंगी अमृत संजीवनी केन ट्रान्सपोर्टचे चेअरमन पराग संधान यांनी उपस्थित कलाकारांचे विशेष कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. पुढील काळात नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी असेच उपक्रम राबवले जातील, असे त्यांनी आश्वासन दिले.आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपवणूक करण्यासाठी सण उत्सव हे सामाजिक ऐक्याचे प्रतिंबीब असतात या भावनेने असे उपक्रम राबविण्यात येतात असेही पराग संधान यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाला कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर उपस्थित होते. भजनसंध्या समाप्तीनंतर सर्व कलाकारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष गणेश आढाव यांच्यासह बाळासाहेब गवारे, अमित वडांगळे, वैभव सोनवणे, शंकरराव देवकर, राजेंद्र सुपेकर, स्वप्नील ठोंबरे, ऋषिकेश देवकर, प्रकाश चव्हाण, कैलास गवारे, नईमभाई शेख, बाबासाहेब आढाव, गुरुनाथ सुपेकर, रोहित जाधव, उमेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.







