banner ads

तुमच्या नेत्यांनी गोदावरी नदीवर किती पूल बांधून खुले केले-नवाज कुरेशी

kopargaonsamachar
0

 तुमच्या नेत्यांनी गोदावरी नदीवर किती पूल बांधून खुले केले-नवाज कुरेशी


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
एकेकाळी अत्यंत खराब झालेल्या नगर-मनमाड राज्यमार्गाचे कोपरगाव-सावळीविहीर ७५२-जी राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करून ११ किलोमीटरसाठी १९१ कोटी रुपयांचा निधी आणून संपूर्ण ११ किमी रस्ता उड्डाण पुलांसह सिमेंट कॉंक्रीटचा होत असून माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात गोदावरी नदीवर बांधलेल्या पुलास समांतर पुलाचे काम अंतिम टप्यात आहे. हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका, पण तुमच्या नेत्याने गोदावरी नदीवर किती पूल बांधले व किती खुले केले हे तुमच्या नेत्याला अगोदर खाजगीत विचारा अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी कोल्हे गटाच्या शहराध्यक्षावर केली आहे. 

एन.एच.७५२ जी या राष्ट्रीय महामार्गावरील कोपरगाव शहराजवळून जाणाऱ्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्यावर नवीन समांतर पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. नेहमीच राजकारण करण्याच्या नादात कोल्हे गटाकडून आपल्या कार्यकर्त्याच्या नावे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून टीका करतांना राजकीय पोळी भाजण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला होता. त्या प्रयत्नांना नवाज कुरेशी यांनी समर्पक उत्तर देतांना सांगितले की, तुमच्या नावावर ज्यांनी प्रसिद्धीपत्रक काढले त्या तुमच्या नेत्याला तुम्ही खाजगीत विचारा त्यांनी चाळीस वर्षात गोदावरी नदीवर किती पूल बांधले? व खुले केले? मग प्रगतीपथावर असलेला पूल खुला करण्याची भाषा करा अशा शब्दात सुनावले आहे. ते म्हणाले पूल सुरु करण्याची भाषा करणे सोपे आहे मात्र पूल उभारण्यासाठी मंजुरी मिळविण्यापासून निधी मिळेपर्यंत कसा आणि किती पाठपुरावा कारावा लागतो हे तुम्हाला कधी समजणारच नाही

. कारण गोदावरी नदीवर पूल उभारण्याचा विचार देखील तुमच्या नेत्यांच्या मनात कधी आलाच नाही व ते त्यांचे कामही नाही.
मा.आ.अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात धारणगाव-कुंभारी, चास नळी, कोपरगाव शहरातील बेट भागाला जोडणारा पूल, जुन्या नगर-मनमाड महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुलाला समांतर पूल असे गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी मोठे पूल बांधून तसेच राज्यमार्ग व ग्रामीण भागातील रस्त्यांवर छोटे-मोठे पूल उभारून दळणवळण वाढविण्यास प्राधान्य दिले

. तोच कित्ता आ.आशुतोष काळे यांनी गिरवत एन.एच.७५२ जी या राष्ट्रीय महामार्गावर समांतर पूल व वारी येथे गोदावरी नदीवर पूल उभारले या दोन्ही पुलांचे काम अंतिम टप्याकडे जात आहे आणि काम पूर्ण होताच लवकरच वाहतुकीसाठी खुले होणार हे जनतेला माहित आहे.परंतु आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी लोकप्रतिनिधींवर टीका करून स्वतःची प्रसिद्धी आणि उदो उदो करण्यासाठी कोल्हे गटाचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आततायीपणा करू नका, थोडा संयम धरा, हा पुल खुला होणारच आहे व अजूनही बरेच पुल होणार आहेत. त्यामुळे आपल्या राजकारणापायी निष्पाप नागरीकांचा जीव घेवू नका असे नवाज कुरेशी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!