कोपरगाव तालुक्याला मिळाली ३१.७० कोटींची नुकसान भरपाई
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून त्याचा फटका संपूर्ण कोपरगाव मतदार संघाला देखील बसला होता. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भर पावसात पाहणी करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देवून पंचनाम्याबाबत दाखविलेल्या दक्षतेमुळे कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांचा अतिवृष्टी बाधित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३१.७० कोटीची नुकसान भरपाई शासनाकडून जाहीर करण्यात आली असून हि नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली .
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कोपरगाव मतदार संघात शनिवार (दि.२७) रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या पावसाने सलग अठरा तास हजेरी लावत रौद्र रूप धारण करून शेतीचे अतोनात नुकसान केले होते. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन,बाजरी,कापूस,मका, तूर, भाजीपाला, फळ पिकांचे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी करत मतदार संघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने व तातडीने करून त्याचा अहवाल लवकरात लवकर वरिष्ठांकडे सादर करण्याच्या सूचना महसूल आणि कृषी विभागाला दिल्या होत्या.
मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार यांची भेट घेवून मतदार संघातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती देवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरीकांना जास्तीत जास्त मदत द्यावी असे साकडे घातले होते. नुकसानीच्या पंचनाम्याबाबत शेतकरी व नागरीकांच्या असलेल्या तक्रारींची दखल घेवून तहसीलदार महेश सावंत, गटविकास अधिकारी संदीप दळवी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून एकही नुकसानग्रस्त शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहणार नाही यासाठी योग्य पद्धतीने अचूक पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या सर्व एकत्रित प्रयत्नातून कोपरगाव तालुक्यातील सर्व गावांचा अतिवृष्टी बाधित क्षेत्रात समावेश करण्यात येवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३१.७० कोटीची नुकसान भरपाई शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे

व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यात सुरुवात झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्याही बँक खात्यात लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी आधार मिळणार आहे..