तारांच्या घर्षणाने शॉर्टसर्किट, उसाने घेतला पेट, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
कोपरगाव तालुक्यातील विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे टाकळी येथील शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचे घर्षण होऊन शार्टसर्कीटमुळे येथील एक एकर उभ्या ऊसाला आग लागली,त्यामुळे पुर्ण ऊस जळुन भस्मसात झाला.सदरील घटना दि.२४ आक्टोबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडली.
टाकळी येथील प्रगतशील शेतकरी वासुदेव कारभारी देवकर यांचा गट नंबर १८० मधील चालु गळीतास असलेला एक एकर ऊस जळीतात खाक झाला सदर क्षेत्रात असलेल्या विज वितरण कंपनीच्या पोल जवळ तारांचे शॉट सर्किट होऊन उसास आग लागली शेजारी जवळ असलेल्या वस्तीवरील निखिल देवकर यांच्या ही आग लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच फोन करून गजानन देवकर यांना कळविले
आग विझवण्यासाठी संपूर्ण देवकर वस्ती येथील युवकांनी तातडीने आग नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची मदत केली शेजारी पश्चिम बाजू क्षेत्राच्या मका ऊस उत्तरेकडी बाजू सात ते आठ एकर ऊस इतर अनेक शेतकऱ्यांचे ऊस जवळ असल्याने फार मोठे हानी टळली
या मदतीसाठी मा सभापती सुनिल देवकर ,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सतीश देवकर ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शशिकांत देवकर, उपसरपंच संजय देवकर शाम भोकरे ,प्रवीण मालकर, प्रसाद मालकर ,अनिल बापूसाहेब देवकर ,पांडुरंग देवकर, निखिल देवकर ,गजानन देवकर ,आप्पासाहेब देवकर ,पिंटू देवकर ,जगन्नाथ देवकर, साहिल देवकर, ओम देवकर, बापू मालकर ,भाऊसाहेब देवकर, परसराम देवकर ,गोरख देवकर, ओम देवकर ,सतिष मालकर, राजीव बापु देवकर ,भाऊसाहेब मालकर, बद्रीनाथ शेलार आणि विशेष पाठीवरील पेट्रोल पंपाने पाणी मारून आग नियंत्रणस भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख अनिल पांडुरंग देवकर यांनी चांगले प्रयत्न केले
सदर प्रसंगी एम एस सी बी चे वायरमन निकम , हुळेकर आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे शेतकी विभागाचे सुशांत आहेर यांनी पाहणी केली.








