banner ads

कोपरगांव बाजार समतीची शेतक-यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना

kopargaonsamachar
0

 कोपरगांव  बाजार समतीची शेतक-यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना


कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
 महाराष्ट्र राज्य़ कृषि पणन मंडळ, पुणे अंतर्गत कृषि उत्पन्न बाजार समिती कोपरगांव मार्फत शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत असुन शेतक-यांचा शेतमाल वखार महामंडळाचे गोदामात ठेवून चालु बाजार भाव दराच्या 75 टक्के रक्कम शेतक-याच्या बॅक खात्यावर आरटीजीएस /एनईएफटीव्दारे जमा करण्यात येते. जेव्हा बाजारात शेतमालाचे दर कमी असतात त्यावेळी शेतक-यांचे कमी दरात शेतमाल विक्री करून आर्थिक नुकसान होवू नये तसेच भविष्यात वाढणा-या भावाचा लाभ शेतक-यांना मिळावा यासाठी शेतमाल तारण कर्ज योजना ही शेतक-यासांठी फायदेशीर ठरणारी आहे.

            सदर योजनेत स्वच्छ व चांगल्या प्रतीचा शेतमाल स्वीकारण्यात येतो. शक्यतो 12 टक्के पेक्षा अधिक आद्रता असलेला शेतमाल तारण कर्ज योजनेत स्वीकारला जात नाही. त्यामुळे शेतक-यांनी शेतमाल स्वच्छ करून व उन्हात वाळवून शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा घेण्यासाठी वखार महामंडळाचे गोदामात शेतमाल ठेवल्यानंतर मिळालेल्या वखार पावती वर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दराने 6 महिन्यासाठी शेतक-यांना शेतमाल तारण योजनेत कर्ज पुरवठा त्वरीत करण्यात येतो.

            तरी शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीन शेतमालाची कमी दरात विक्री न करता शेतमाल साठवून ठेवून त्यावर शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत 6% व्याज दराने कर्ज घेवून आपली तात्पुरती गरज भागवावी व भाववाढ होईल तेव्हा शेतमाल विक्री करून वाढणा-या भावाचा लाभ घ्यावा असे आवाहन 

कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती  साहेबराव  रोहोम, उपसभापती  गोवर्धन. परजणे व सर्व संचालक मंडळ तसेच सचिव  एन.एस. रणशुर यांनी केले आहे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!