banner ads

नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध -आ. आशुतोष काळे

kopargaonsamachar
0

 नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध  -आ. आशुतोष काळे

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
पुढच्या जनता दरबाराच्या वेळी नागरीकांचे प्रश्न सुटलेच पाहिजे अशा सक्त सूचना मागील जनता दरबारात पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार बहुतांश नागरीकांच्या समस्या सुटल्या असल्याचे दिसून येत आहेत हि समाधानाची बाब आहे. मतदार संघातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून  जनता दरबार यापुढेही सुरूच राहतील. यापुढील काळातही नागरीकांच्या उर्वरित समस्या तातडीने सोडवा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

सोमवार (दि.१३) रोजी पंचायत समितीच्या सर्व विभागातील तसेच पशु संवर्धन व शासकीय पशु पैदास केंद्र (वळूमाता)  या विभागा संदर्भातील नागरीकांच्या विविध समस्या व अडचणी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेवून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या जनता दरबारात अनेक नागरिकांनी आपले प्रश्न मांडले परंतु मागील जनता दरबाराच्या तुलनेत या जनता दरबारात प्रश्न घेवून येणाऱ्या नागरीकांची संख्या कमी होती. ज्या नागरीकांनी प्रश्न मांडले त्यामध्ये रस्त्यांचा प्रश्न, भूमिगत गटारींचा प्रश्न,घरकुल, ग्रामसेवक उपस्थित राहत नाही, घंटा गाडी बंद असल्यामुळे गावात कचऱ्याचे ढीग साचले, घरकुलाला वाळू मिळत नाही, पशु संवर्धन विभागाकडून शासनाच्या लाभाच्या योजना नागरीकांपर्यंत पोहोचत नाही, जिल्हा परिषदेतील शिक्षक सातत्याने गैरहजर असतात, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ठ दर्जाचा पोषण आहार दिला जातो अशा अनेक समस्या नागरिकांनी या जनता दरबारात आ.आशुतोष काळे यांच्या पुढे मांडल्या असता त्यांनी त्याच ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला त्याचा खुलासा करण्याचे सांगून त्या अडचणी तातडीने सोडविण्याच्या सूचना केल्या.
आ.आशुतोष काळे म्हणाले की, घरकुलासाठी वाळू उपलब्ध व्हावी यासाठी १२०० ब्रास वाळू राखीव ठेवण्याबाबत तहसीलदार महेश सावंत यांना सूचना केल्या आहेत. ज्या गावातील खराब रस्त्यांचे व भूमिगत गटारींचे प्रश्न आहेत त्यासाठी त्या रस्त्यांचे व गटारींचे अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव पाठवा त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू.कोपरगाव तालुक्याला ६०८० घरकुलांचे टार्गेट देण्यात आले होते परंतु त्यापैकी २२०० लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम सुरु आहे त्यामुळे उर्वरित घरकुल लाभार्थ्यांनी लवकरात लवकर घरकुलाचे काम सुरु करावे जेणेकरून पुढील यादीतील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणे सोपे होईल. राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुलासाठी आवश्यक मदत देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी संगितले. तसेच मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित झाले नसल्याचे काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत नुकसान भरपाई  मिळाली पाहिजे  यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी, मा.उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, संचालक अनिल कदम, राहुल रोहमारे, दिलीपराव बोरनारे, प्रशांत घुले, शंकरराव चव्हाण, दिनार कुदळे, श्रावण आसने, गौतम बँकेचे चेअरमन संजय आगवण, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक राजेंद्र निकोले,रामदास केकाण, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सचिन रोहमारे,  तसेचतालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप,ल.पा. विभागाचे उपनिबंधक संतोष दळवी, पंडित वाघिरे, गटशिक्षणाधिकारी श्रीम. शबाना शेख, अभियंता आर.टी. दिघे, पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीम. श्रद्धा काटे, विस्तार अधिकारी तोरवणे, शाखा अभियंता सी.डी. लाटे, आरोग्य विकास अधिकारी एम.एस.पथवे, कृषी अधिकारी सचिन कोष्टी, गणेश सोनवणे, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!