banner ads

धामोरीत शिलाई प्रशिक्षण शिबिराला महिलांचा प्रचंड प्रतिसाद

kopargaonsamachar
0

 धामोरीत शिलाई प्रशिक्षण शिबिराला महिलांचा प्रचंड  प्रतिसाद

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 शहरातील महिला भगिनी पारंपारिक कौशल्यासह आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोग करत व्यावसायिक क्षेत्रात भक्कमपणे उभ्या आहेत. ग्रामीण भागातील महिलां देखील रोजगाराच्या क्षेत्रात कुठेही मागे राहणार नाही. याकरीता त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व महिलांच्या सशक्तीकरणासाठी आ.आशुतोष काळे नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्याच पुढाकारातून आणि सहकार्याने महिलांसाठी शासनमान्य शिलाई प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आ.आशुतोष काळे व तेजतारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासनमान्य शिलाई प्रशिक्षण शिबिर धामोरी येथे ११ ते १७ ऑक्टोबर दरम्यान संपन्न होणार असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी महिलांना शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
महिलांच्या सशक्तीकरणासाठी आ.आशुतोष काळे यांचा नेहमीच पुढाकार असतो. सामाजिक भान ठेवून काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. महिला बचतगटांना बळकटी देवून महिलांच्या उन्नतीसाठी त्यांचे सातत्याने काम सुरू आहे. अशा अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या नवीन संधी तर मिळतीलच त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या  स्वावलंबी होतील व महिलांना आत्मसन्मान देखील मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे.याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनिल मांजरे, मनोज जगझाप, गौतम बँकेचे संचालक रामराव जगझाप, अरुण भाकरे, दत्तात्रय वाघ, सजनराव आरगडे, तेजतारा फाउंडेशनच्या अध्यक्षा तेजश्री लासूरे, बिपीन लासूरे, माणिकराव सोमासे, संदीप जगझाप, सचिन कुऱ्हाडे, गंगाधर थोरात, ललित मांजरे आदी मान्यवरांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सामान्य महिलांपर्यंत पोहोचणारे असे उपक्रम आ.आशुतोष काळे नेहमीच राबवत असतात. त्यांनी या शिबिराच्या माध्यमातून आमच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली यावरून त्यांची महिलांप्रती असलेली आस्था दिसून येते. हे शिबिर म्हणजे आमच्यासाठी एक सुवर्णसंधी होती. या शिबिरातून शिलाईचं शिक्षण तर मिळालंच, पण एक स्त्री म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची उमेदही मिळाली अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थित महिलांनी यावेळी दिल्या.

       
 

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!