banner ads

कोपरगांव पंचायत समिती गणातील आरक्षण जाहिर

kopargaonsamachar
0

 कोपरगांव पंचायत समिती गणातील आरक्षण जाहिर


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
तालुक्यात पंचायत समितीचे 10गण तर जि.प.गट 5 आहेत. या सर्व गणांचे व जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. पंचायत समिती गणांचे आरक्षण उपजिल्हाधिकारी सायली सोळंके  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोडतीत जाहिर झाले  यावेळी तहसीलदार महेश सावंत  उपस्थित होते.

सोडतीत निघालेले आरक्षण असे
सुरेगाव .. सर्वसाधारण महिला
धामोरी .. अनुसूचित जमाती
ब्राम्हणगाव .. नागरीकांचा मागासप्रवर्ग महिला
करंजी बु. .. नागरीकांचा मागासप्रवर्ग
वारी .. अनुसूचित जाती
संवत्सर .. सर्वसाधारण
शिंगणापूर .. सर्वसाधारण महिला
कोळपेवाडी .. सर्वसाधारण महिला
चांदेकसारे .. सर्वसाधारण
पोहेगाव बु. .. सर्वसाधारण महिला
10 गणांमध्ये वेगवेगळया वर्गातून 5 महिलांसाठी आरक्षण राखीव आहे.
जिल्हापरिषद 5 गटांचे आरक्षण असे
सुरेगाव .. नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
शिंगणापूर .. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
पोहेगाव . सर्वसाधारण महिला
संवत्सर .. सर्वसाधारण
ब्राम्हणगाव .. सर्वसाधारण
जिल्हा परिषद 5 गटांपैकी 3 महिला राखीव आहे.


कोपरगांव तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण जाहीर झाल्यानंतर तालुक्यात काहीजण खुशीत तर काही लोकांपुढे यक्ष  प्रश्‍न उभा राहिला आहे. एकीकडे आरक्षणाचा लाभ अपेक्षित ठिकाणी मिळाल्याने आनंदाचे वातावरण दिसत आहे काही गट,गणातील कार्यकर्त्यांमध्ये एकूण आरक्षणाबाबत नाराजीची भावना दिसत आहे.
या आरक्षणानुसार सुरेगाव व शिंगणापूर हे गण सर्वसाधारण महिला वर्गाकरिता  तर धामोरी हा गण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठरला आहे ब्राम्हणगाव व करंजी बु. हे गण नामांतरीत मागासप्रवर्गात समाविष्ट झाले असून वारी या गणाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळाले आहे. संवत्सर,चांदेकसारे हे सर्वसाधारण तर पोहेगाव गणाला सर्वसाधारण महिलेकरिता घोषित झाले आहे.

तालुक्यातील राजकिय समिकरणावर या आरक्षणामुळे मोठा प्रभाव पडणार असून विविध पक्षांच्या गटामध्ये नव्या आरक्षण रचनेनुसार उमेदवारांची मनधरणी कशी करायची याची सत्व परिक्षा आहे. नव्या आरक्षण धोरणेनुसार काळे गट व कोल्हे गटाची भुमिका कशी राहील हे लवकरच स्पष्ट होईल. पंचायत समिती गण व गटाच्या निवडणुकीसाठी विखेंची भुमिका महत्वाची ठरणार आहे. गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे व शिंदे सेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितिन औताडेंच्या भुमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!