banner ads

हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूल अजिंक्य

kopargaonsamachar
0

 हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूल अजिंक्य


विभागीय स्पर्धेत करणार जिल्ह्याचे नेतृत्व

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑक्टोबर रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख, ऊस विकास अधिकारी आण्णासाहेब चिने, सिव्हिल इंजिनियर अर्शद सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. या  स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी विशाल गर्जे आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत रंगलेला स्पर्धेचा अंतिम सामना यश अकॅडमी, सोनई विरुद्ध गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर या दोन्ही संघामध्ये झाला. गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी खेळाडूंनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करून या सामन्यात एकतर्फी वर्चस्व ठेवून प्रतिस्पर्धी यश अकॅडमी, सोनई संघाचा ८-० असा पराभव करून हि स्पर्धा जिंकली.
गौतम पब्लिक स्कूलचा १४ वर्षाखालील हॉकी संघ गौतम पब्लिक स्कूल येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. स्पर्धेत मुला-मुलींच्या १४ वर्षाखालील एकूण ५ संघानी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेचे अंतिम सामने यश अकॅडमी सोनई व निडो इंटरनॅशनल स्कूल संगमनेर तर गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर विरुद्ध अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल संगमनेर असे झाले.मुलींच्या गटात प्रवरा कन्या विद्यालय संघाने बाजी मारून विजेतेपद पटकावले. गौतम पब्लिक स्कूलच्या विजेता हॉकी संघास प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, प्रशिक्षक इसाक सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे,संस्थेच्या सचिव सौ.चैताली काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सर्व संस्था सदस्य, संस्था इन्स्पेक्टर नारायण बारे, प्राचार्य नूर शेख आदी मान्यवरांनी गौतमच्या विजेत्या हॉकी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 गौतम पब्लिक स्कूलमध्ये सर्व क्रीडा प्रकारांसाठी सर्व सुविधांयुक्त भव्य मैदाने उपलब्ध आहे.त्यामुळे सर्व जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंना आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात.त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर पार पडणार असून या स्पर्धेचे भव्य-दिव्य नियोजन करण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.
-सौ.चैताली काळे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!