banner ads

खडकी नदीवरील पुलामुळे दळणवळणाचा प्रश्न कायमचा निकाली -आ. आशुतोष काळे

kopargaonsamachar
0

 खडकी नदीवरील पुलामुळे दळणवळणाचा प्रश्न कायमचा निकाली -आ. आशुतोष काळे

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 दोन तालुक्यांना जोडणाऱ्या खडकी नदीवरील पुलामुळे सर्वसामान्य नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा निकाली निघाला असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.  

पोहेगाव येथे ०१ कोटी २५ लाख रुपये निधीतून करण्यात आलेल्या पोहेगाव-देर्डे रस्त्यावरील खडकी नदीवरील पुलाचे लोकार्पण व ४० लाख रुपये निधीतून करण्यात आलेल्या पोहेगाव,शहापूर डेअरी ते वेस रस्त्याच्या मजबू्तीकरण कामाचे भूमीपूजन  आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पोहेगाव,शहापूर डेअरी ते वेस रस्ता टप्या टप्याने पूर्ण केला असून काकडी विमानतळाकडे जाणाऱ्या गावांसाठी या रस्त्याचा उपयोग होतो. हा रस्ता वेस पर्यंत पूर्ण झाला असून त्यापुढील रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे काकडी विमानतळाकडे जाणाऱ्या गावातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे. खडकी पुलाचा मागील अनेक वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित होता नागरीकांच्या मागणीनुसार या पुलाचा प्रश्न सुटला आहे. हा फक्त पूल किंवा रस्ता नाही, तर अनेक गावांच्या प्रगतीचा मार्ग आहे. अशा प्रकारची पायाभूत कामे ही गावच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. मी नेहमीच नागरीकांच्या गरजा समजून घेत त्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असून जनतेच्या मिळत असलेल्या पाठबळावर यापुढील काळात आणखी महत्त्वाची विकासकामे मार्गी लावू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली.  

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रविण शिंदे, संचालक वसंतराव आभाळे, राहुल रोहमारे, गंगाधर औताडे, मा.संचालक सचिन रोहमारे, पद्मविभुषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता साहिल शेख, कॉ.सोमनाथ गोडसे, एम.टी. रोहमारे, गौतम सहकारी बँकेचे संचालक बापूराव जावळे, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, संजय गुरसळ, पंकज पुंगळ, विलास चव्हाण, आबासाहेब दहे, संजय शिंदे, किरण होन, नंदकिशोर औताडे, देवेंद्र रोहमारे, वसीम शेख, उत्तमजी भालेराव, मयूर रोहमारे, पोपटराव गुंड, सुधाकर औताडे, अशोक काकडे, ज्ञानदेव होन, भाऊसाहेब सोनवणे, जयंत रोहमारे, योगीराज देशमुख, राजेंद्र औताडे, विशाल रोहमारे, बाळासाहेब औताडे, ज्ञानेश्वर औताडे, काशिनाथ डूबे, निलेश औताडे, वाल्मीक नवले, बाळासाहेब सोनवणे, शिवाजी होन, दत्तात्रय जाधव, योगेश गीते, महेंद्र वक्ते, विकास डूबे, रामनाथ डूबे किरण वक्ते, विलास डूबे चांगदेव शिंदे, संजय रोहमारे, माधव गायकवाड, रमेश डूबे, बाळासाहेब औताडे, अमोल आभाळे, विलास जाधव, योगेश औताडे, साहेबराव भालेराव, नरहरी रोहमारे, रावसाहेब भुजबळ, धेनक सर, बाळासाहेब औताडे, दिलीप भुजबळ, मेजर मोरे, बाबुराव कोल्हे, प्रमोद रोहमारे, माऊली वाघ, सचिन होन, बाळासाहेब घेर, गंगाराम घारे, राजेंद्र रोहमारे, भाऊसाहेब होन, आण्णा चौधरी आदी उपस्थित होते
 राज्य मार्ग ६५ मुळे नागरीकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेवून झगडे फाटा ते वडगाव पान तालुका हद्दीपर्यंतच्या रस्त्यासाठी १७ कोटी निधी देवून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु सातत्याने पुणतांबा फाट्यावरून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीचा भार भक्कम पाया नसलेल्या या रस्त्याला सोसवत नसल्यामुळे पुन्हा या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत.ज्याप्रमाणे एन.एच.७५२ जी सावळीविहीर-कोपरगाव व राज्य मार्ग-०७ देर्डे फाटा ते भरवस फाटा तालुका हद्द या रस्त्यांचे भक्कम काम सुरु आहे त्याप्रमाणेच राज्य मार्ग ६५ हा झगडे फाटा ते वडगाव पान तालुका हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे देखील काम होणार आहे त्यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे आणि लवकरच ते काम पण मीच पूर्ण करणार आहे.
 आ.आशुतोष काळे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!