banner ads

क्रीडा शिक्षक शिवप्रसाद घोडके यांची तालुका क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती

kopargaonsamachar
0

 क्रीडा शिक्षक शिवप्रसाद घोडके यांची तालुका क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

कोपरगांव येथील क्रीडा क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारे क्रीडा शिक्षक शिवप्रसाद प्रकाश घोडके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तालुका क्रीडा अधिकारी गट ‘ब‘ राजपत्रीत ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवून येवला येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. कोपरगांव तालुक्यातील ते पहिले तालुका क्रीडा अधिकारी होण्याचा बहुमान मिळाला आहे. 

शिवप्रसाद घोडके यांचे वडील प्रकाश घोडके हे खाजगी नोकरी करुन निवृत्त असून आई अर्चना गृहिणी आहे. शिवप्रसाद यांचे शालेय शिक्षण श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, कोपरगांव येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण एस. एस. जी. एम. महाविद्यालय, कोपरगांव येथे झाले आहे. प्रवरा शारीरिक शिक्षण महाविद्यालय प्रवरानगर, लोणी येथे क्रीडा शिक्षकाची पदवी संपादन केली आहे. 
राहाता येथील साध्वी प्रितीसुधाजी इंग्लिश मिडिअम स्कूल (डांगे पॅटर्न अंतर्गत) येथे सुरुवातीला क्रीडा शिक्षक म्हणून काम केले असून त्या नंतर संत जनार्दन स्वामी महर्षी विद्या मंदिर, कोकमठाण ता. कोपरगांव येथे क्रीडा शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम केले आहे. 

त्यांचे व्हाॅलीबाॅल, टेबल टेनिस, तलवारबाजी, थ्रो बाॅल यासह अनेक क्रीडा प्रकारात नैपुण्य आहे. त्यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार अहिल्यानगर, अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, नाशिक येथील युवा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे. माजी सैनिक आप्पा घोडके यांचे ते नातू आहेत. तसेच महाराष्ट्र शासन शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके यांचे ते पुतणे असून महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांचे बंधू आहेत. 
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत त्यांनी हा यशाचा पल्ला गाठला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


माझे आजोबा माजी सैनिक आप्पा घोडके यांनी सर्वसामान्य परिस्थितीची करुन दिलेली जाण आणि प्रामाणिक विचार मला या यशाच्या वाटेवर घेवून आला आहे. माझ्या आई वडिलांचे सोबत मला या क्रीडा क्षेत्रात आणणारे माझे काका दिलीपराव घोडके सर, अशोक दुधारे सर (नाशिक), अरुण चंद्रे सर, मकरंद को-हाळकर सर, राजेंद्र पाटणकर सर यांचे सह अनेक क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले. मला मिळालेल्या जबाबदारीचे काम क्रीडा क्षेत्रात शालेय पातळीवर तसेच ग्रामीण व शहरी भागातील खेळाडू घडविण्यासाठी झोकून काम करणार आहे. 
     - शिवप्रसाद घोडके
तालुका क्रीडा अधिकारी (नाशिक विभाग)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!